Truak Fire| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: केबलची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक लागली आग

Goa News: पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना ; शिवोलीत बर्निंग ट्रकचा थरार

दैनिक गोमन्तक

Goa News: शिवोली व आसगाव यांच्या सीमेवर सोनारखेड येथे शनिवारी सकाळी वीज केबलची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील केबल रिळचा संपर्क जीवंत वीजवाहिन्यांशी आल्याने ट्रकमध्ये अचानक आग लागली आणि परिसरात खळबळ उडाली.

मात्र, हणजूण येथील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखून रस्त्यावरून जाणारा खासगी पोकलॅन थांबविला आणि त्याच्या साहाय्याने केबलचा जळता रिळ ट्रकमधून खाली पाडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

यावेळी ट्रकचालकानेही तात्काळ ट्रक रस्त्याच्या एका बाजूला उभा केला आणि केबिनमधून उडी मारून प्राण वाचविले. शिवोली पंचक्रोशीत सध्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून या कामासाठीच या केबल्स नेण्यात येत होत्या.

...तर ट्रकच खाक झाला असता

या आगीची ट्रकचालकाला वेळीच कल्पना दिली नसती तर तो जळता ट्रक शिवोलीपर्यंत पोहोचला असता आणि मोठा अनर्थ घडला असता. मात्र, शनिवारी सकाळी हणजूण वाहतूक कक्षाशी संबंधित पोलिसांनी तात्काळ ट्रक थांबवून ही आग रोखली. आसगाव तसेच शिवोली पंचायत मंडळाकडून त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT