Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: तिब्बल सीट निघाले म्हणून पोलिसांनी अडवले; तर वेगळेच सत्य आले बाहेर...

कोलवा येथील प्रकार

Akshay Nirmale

Goa Traffic: दुचाकीवरून तिब्बल सीट निघालेल्या कोलवा येथे वाहतूक पोलिसांनी अडवले. पण त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना वेगळेच सत्य समजले आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोलावा येथे आज, गुरूवारी वाहतूक पोलिस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी GA 08 P 7472 ही दुचाकी थांबवली. या ग्लॅमर या दुचाकीवरून तिघे जण चालले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यामुळे त्यांच्याकडील मोटरसायकलचे तपशील पोलिसांनी तपासले.

त्यावरून या दुचाकीचा मूळ मालक कुणी दुसराच असल्याचे समजले. मूळ मालक असलेल्या आल्ड्रिन कुथिन्हो यांना पोलिसांनी फोन लावला. त्यांनी सांगितले की, त्यांची दुचाकी कार्मालाईट माँटेसरी येथून चोरीला गेली होती. कुथिन्हो तेथे प्रार्थनेसाठी गेले होते.

त्यानंतर पोलिसांनी या तिघा संशयितांची आणखी चौकशी केली असता त्यांनीच ही दुचाकी चोरल्याचे कबुली दिली. कुथिन्हो यांनी त्यांची मोटरसायकलची ओळख पटवली आहे. पुढील तपासासाठी संशयितांना वाहतूक पोलिसांनी मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

कोलवा वाहतूक पोलिस, पोलिस उपनिरीक्षक देवू, पोलिस उपनिरीक्षक हरिश देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक गावडे, हेड कॉन्स्टेबल हेमंत, कॉन्स्टेबल राफेल, शिवानंद, राऊत, सुनील यांचा या वाहतूक पोलिसांच्या पथकात समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT