Goa traffic police Action against 35 drunkards including Kadamba bus driver  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: गोवा वाहतूक पोलिसांची धडक कारवाई! कदंब बसचालकासह 35 मद्यपींवर कारवाई

Goa Traffic Police: दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधातील मोहीम गोवा वाहतूक पोलिसांनी आणखी कडक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police: दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधातील मोहीम गोवा वाहतूक पोलिसांनी आणखी कडक केली आहे. काल अशा ३५ वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्‍यात एका कदंब बसचालकाचाही समावेश आहे. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्‍याअंतर्गत काल ३५ चालकांवर कारवाई करण्‍यात आली. त्‍यांची अवजड वाहनेही पोलिसांनी जप्त करण्‍यात आली आहेत.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांविरोधातील ही मोहीम आणखी कडक करण्‍यात येणार असल्‍याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले. अशा वाहनचालकांना दारू पिऊन वाहन चालविण्यास परावृत्त केले जाईल.

काही महिन्यांपूर्वी कदंब वाहतूक महामंडळाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा आणली आहे. दारूच्या नशेत सापडलेल्या वाहनचालकांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी. आता दारूच्या नशेत पकडलेल्‍या कदंब बसचालकावर केटीसी काय कारवाई करणार, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT