Traffic Rule Violation Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Challan Fine: गोवा वाहतूक पोलीस विभागाला मोठा फटका! दंड महसुलात 1.80 कोटींची घट

Traffic Fine Revenue Goa: दक्षिणेतील १८ पोलिस स्थानकात ६९३ तर गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ५६६३ प्रकरणे नोंद झाली होती. त्यामुळे ४९७० प्रकरणे कमी नोंद झाली आहेत.

Sameer Panditrao

पणजी: यावर्षी एप्रिल महिन्यात फक्त वाहतूक निरीक्षकच कारवाई करत असल्याने ८०७७ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली गेली. मात्र, गेल्यावर्षी याच महिन्यात ३९,४३३ चालकांवर कारवाई झाली होती. दंडात्मक महसूलही १.८० कोटी कमी जमा झाला आहे. त्यामुळे दंड महसूल प्रमाण सुमारे ७८ टक्क्यांनी घटले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड देण्याचा, वाहनांची कागपदपत्रे तपासण्याचा तसेच ‘बॉडी ऑन कॅमेरा’ लावण्याचा अधिकार हा फक्त पोलिस निरीक्षकांनाच असल्याचे मुख्यमंत्र्यानी आदेश दिल्यावर त्याचा परिणाम वाहनचालकांविरोधातील कारवाईवर झाला आहे. तसेच दंडात्मक महसुलालाही फटका बसला आहे.

राज्यात ३२ वाहतूक पोलिस कक्ष असून त्यातील १४ उत्तरेत, तर १८ दक्षिणेत आहेत. उत्तर गोव्यातील १४ वाहतूक पोलिस स्थानकात एप्रिल २०२५ या महिन्यात ५३६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. मात्र, गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ४१३७ वाहनांविरुद्ध कारवाई झाली होती. त्यामुळे ३६०१ प्रकरणे कमी झाली आहेत.

दक्षिणेतील १८ पोलिस स्थानकात ६९३ तर गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ५६६३ प्रकरणे नोंद झाली होती. त्यामुळे ४९७० प्रकरणे कमी नोंद झाली आहेत. निरीक्षकालाच अधिकार देण्याच्या निर्णयामुळे महसुलावर मोठा फरक पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे माहीत असूनही कोणीही सरकारच्या या निर्णयाविरोधात बोलण्यास तयार नाहीत.

Police

प्रत्येक वाहतूक पोलिस स्थानकात एकच निरीक्षक असतो. निरीक्षकाच्या अनुपस्थितीत उपनिरीक्षकाला तात्पुरता ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला त्याच्या अधिकार क्षेत्रातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी काम करावे लागते. त्यातच ‘बॉडी ऑन कॅमेरा’ वापरण्याचा त्याला अधिकार असल्याने कारवाईचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. एकाचवेळी निरीक्षकाला अनेक ठिकाणी धावाधाव करणे शक्य नाही.

जानेवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत १,०७५१९ वाहन चालकांना दंड ठोठावून ६.९५ कोटी महसूल जमा झाला आहे तर गेल्यावर्षी या काळात १,५२,८९१ वाहन चलन नोंद होऊन ९.१७ कोटी महसूल जमा झाला होता. त्यामुळे दंडात्मक कारवाईत घट होण्याबरोबरच २.२१ कोटी महसूल कमी जमा झाला आहे. उत्तरेत यावर्षी १३,०७५ वाहन चालकांना दंड दिला आहे तर गेल्यावर्षी १६,८९७ वाहन चालकांना दंड देण्यात आला होता. त्यामुळे दंड महसुलात १९.४९ लाख महसूल कमी झाला आहे. गेल्या चार महिन्यात सुमारे २५.६४ लाख महसुलात घट झाली आहे.

‘बॉडी ऑन कॅमेरे’ वापराविना

वाहतूक पोलिस विभागाकडे सुमारे ३०० हून अधिक ‘बॉडी ऑन कॅमेरे’ आहेत, तर वाहतूक पोलिस स्थानके ३२ आहेत. आणखी काही कॅमेऱ्यांसाठी गेल्या जानेवारीत प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, तो बारगळला आहे. कॅमेऱ्याचा निरीक्षकच वापर करू शकतात. त्यामुळे उर्वरित ‘बॉडी ऑन कॅमेरे’ धूळ खात पडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT