Goa Traffic Cell Dainik Gomantak
गोवा

गोवा वाहतूक खाते मालामाल; नव्या वाहतूक कायद्यानंतर दंड वसुलीत सरासरी 200 टक्के वाढ

एकट्या पणजीत 2019 पासून 4.86 कोटी रूपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Assembly Monsoon Session 2023: गोवा वाहतूक खात्याने 2019 पासून तब्बल 50.52 कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे. 2022 मध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या वाहतूक कायद्यानंतर दंड वसुलीत तब्बल 200 टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती वाहतूक खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सभागृहात दिली. एकट्या पणजीत 2019 पासून 4.86 कोटी रूपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी वाहतूक खात्याने जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यात तब्बल 1 कोटी 03 लाख 25 हजार रूपये दंड गोळा केला आहे. 2019 साली 63.72 लाख, 2020 साली 71.89 लाख, 2021 साली 72.93 लाख आणि 2022 साली 1.74 कोटी रूपये एवढा दंड वसूल केला आहे. असे साडेचार वर्षात वाहतूक खात्याने एकूण 4.86 कोटी रूपये दंड गोळा केला आहे.

राज्यात वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत यासाठी आम्ही नव्या 29 ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवत आहोत, असे वाहतूकमंत्री गुदिन्‍हो विधानसभेत म्‍हणाले.

तसेच, राज्यात ओला-उबेर सारख्या ॲपधारित टॅक्सी सुरू करण्यात येणार नसल्या तरी सर्वसामान्य जन आणि पर्यटकांना त्या हव्या आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारा असे आवाहनही गुदिन्‍हो यांनी केले.

दरम्यान, डिजिटल टॅक्‍सी मीटरची अट रद्द करा, अशी मागणी असली तरीही राज्‍य सरकारला  तसा अधिकार नाही. कारण मीटर संदर्भात न्‍यायालयाने निर्देश दिले आहेत. असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT