Goa Beach Shacks Canva
गोवा

Goa Tourism: पर्यटक गेले कुठे? सिझन संपण्यापूर्वीच 'शॅक' गुंडाळण्यास सुरुवात! व्यावसायिक हवालदिल

Goa Tourist Decline: राज्यातील पर्यटन हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपतो, मात्र यंदा काही शॅक व्यावसायिकांनी अपेक्षेपेक्षा लवकरच आपली शॅक बंद करण्यास सुरुवात केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील पर्यटन हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपतो, मात्र यंदा काही शॅक व्यावसायिकांनी अपेक्षेपेक्षा लवकरच आपली शॅक बंद करण्यास सुरुवात केली आहे. जरी सर्व शॅक अद्याप बंद झालेल्या नसल्या, तरी पर्यटक अपेक्षेप्रमाणे नसल्याने काही शॅक मालकांकडून शॅक बंद करण्यात आल्या.

शॅक संस्कृती ही राज्याच्या पर्यटनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. अनेक पर्यटक फक्त शॅकचा अनुभव घेण्यासाठी गोव्यात येतात. समुद्रकिनाऱ्यावर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, सागरी हवा अनुभवणे हे शॅकमधील अनुभव पर्यटकांसाठी खास आकर्षित असतात.

Mopa Airport Goa

शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले की, शॅकचा अनुभव घेण्यासाठी म्हणून गोव्यात येणारे पर्यटक शॅक मालकांचा आधीच फोन नंबर घेऊन ठेवतात. त्यानंतर जेव्हा ते राज्यात येतात तेव्हा पहिल्यांदा शॅक मालकांना फोन करतात.

माझे शॅक बंद झाल्यानंतर काही दिवसांनी मला एका पर्यटकाने फोन केला आणि शॅक सुरू आहे का विचारले. त्यावेळी मी माझे बंद केल्याचे सांगून इतर शॅक सुरू असल्याचे त्यांना सांगितले. दरम्यान, त्यांना ठिकाणे देखील सुचविली.

मेनंतरही शॅक सुरू ठेवावेत!

राज्यातील काही भागांमध्ये अजूनही पर्यटकांची संख्या चांगली आहे, त्यामुळे तेथील शॅक सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी पर्यटकांची संख्या घटली आहे, तेथे शॅक लवकरच बंद करण्यात आले आहेत. कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे मे महिन्यानंतरही काही दिवस शॅक सुरू ठेवण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Shami Retirement: "...त्या दिवशी क्रिकेट सोडेन", मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे विधान

Pernem: 'आंबिये'च्‍या विद्यार्थ्यांनी गिरवले पुरण शेतीचे धडे, पारंपरिक भातशेतीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

Mirabag Jackwell Project: मीराबागवासीयांसमोर 'जॅकवेल'चा प्रस्ताव, ग्रामस्थांशी चर्चेनंतर प्रकल्प लागणार मार्गी

कुडचडे स्कँडल: केवळ गुन्हा नाही, समाजासाठी इशारा!

लाल फितीत अडकलेली माणुसकी, दोन महिने उलटले तरी 19 मृतदेह शवागारातच! - संपादकीय

SCROLL FOR NEXT