Goa Tourist Places: visit these places during the Diwali holidays Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Places: दिवाळीच्या सुट्टीमध्ये 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

गोव्याला फिरायला जाण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना सर्वोत्तम मानला जाते.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही अद्याप गोव्याला (Goa) गेला नसाल आणि यंदा तुम्हाला दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्या समुद्रकिनारी घालवायच्या असेल तरही योग्य वेळ आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गोव्याला जाणे सर्वोत्तम मानले जाते. या महिन्यात अधिक सूर्य प्रकाश किंवा पाऊस नसतो. यावेळी आल्हाददायक वातावरण असते. जे प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारे असते. जर तुम्हाला कमी वेळेत आणि स्वतात गोव्याचे सौंदर्य पहायचे असेल तर उत्तर गोव्याला नक्की भेट द्या.

Anjuna Beach

* अंजूना बीच

अंजूना बीचला जावून खाद्यपदार्थासह बिचचा आनंद घेवू शकता. येथील लुना रेस्टॉरंट इटालियन पदार्थ प्रसिद्ध आहे. व्हिस्कीअसो किंवा आयरिश कॉफी ची चव घ्यायला विसरू नका. तुम्ही येथे नाश्ता, दुपारचे जेवण आणि स्नॅक्सचा आनंद घेवू शकता. संध्याकाली तुम्ही येथील बीचचा आनंद घेवू शकता. सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही नृत्याचा आनंद घेण्यासाठी पर्पल मार्टिनीला जाऊ शकता.

Vagator Beach

* वाटेगर बीच

वाटेगर बीचवरील बाबका रेस्टॉरंटमधील मिठाई आणि कॉफी खूप प्रसिद्ध आहे. तसेच येथील दालचीनी रोलचा आस्वाद घ्यायला विसरू नका. जर तुम्ही सहकारी असाल तर बीन मी अप रेस्टॉरंटला भेट देवू शकता. या बीचवर तुम्ही सेल्फी काढण्याचा आनंद घेवू शकता. जर तुम्हाला दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ आवडत असतील तर तुम्ही येथील गनपाऊडर रेस्टॉरंटमध्ये जावून दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांचा आनंद घेवू शकता.

Morjim Beach

* मोर्जिम बीच

तुम्ही मोर्जिम बीचला जाण्याचा प्लॅन करू शकता. हे ठिकाण बंगाली खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. पीच आइस्ड चहा येथील वैशिष्ट्य आहे. या बीचवर तुम्ही पिझ्झा, सीफूड आणि टेस्टी नूडल्ससह मावळत्या सूर्याचा आनंद घेवू शकता.

* पणजी

पणजीमध्ये तुम्ही सांस्कृतिक कलेपासून ते प्रसिद्ध कॅफेपर्यंत आनंद घेवू शकता. गोवण हवेळीमध्ये तुम्हाला कला प्रदर्शन पाहायला मिळेल. यानंतर तुम्ही द ब्रैसरीला भेट देऊन सीफूड आणि अल्कोहोलचा आनंद घेवू शकता. संध्याकाळी इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चजवळ फिरताना एखदया अद्भुत दृशाचा आनंद घेता येतो. जर तुम्हाला फोटो काढायची आवड असेल तर येथे नक्कीच भेट द्या.

टीप: फिरायला जाताना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि मास्क दोन्ही सोबत असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT