Mla Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : पर्यटनाची माहिती देण्यासाठी ‘रोड-शो’ करावेच लागतील

Goa Tourism : रोहन खंवटे यांनी केले स्पष्ट विजय सरदेसाई यांनी केल्या काही सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism : पणजी, राज्य सरकारने आता पर्यटन वृद्धीसाठी आध्यात्मिक, वेलनेस आणि निसर्ग पर्यटनावर भर दिला आहे. ज्याची माहिती देण्यासाठी जगभर रोड-शो हे करावेच लागणार आहेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला सांगितले.

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यटन क्षेत्राला उतरती कळा लागल्याने अशा रोड-शोवर पूर्णतः बंदी आणून पर्यटन क्षेत्र विकासासाठी गोमंतकीयांकडून सूचना घ्या, अशी जोरदार मागणी केली.

याविषयीचा मूळ प्रश्न हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारला होता. ते म्हणाले, जगभर पर्यटन खात्याने रोड-शो केले. रोड-शो केलेल्या विभागातून किती विदेशी पर्यटक आले, हे मात्र सरकारने सांगितलेले नाही. मॉस्को, स्पेन,

बर्लिन, लंडन येथे रोड-शोवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तेथून गोव्यात किती पर्यटक आलेत, हे समजले पाहिजे. केंद्र सरकारकडून पर्यटन क्षेत्र वृद्धीसाठी ५८७ कोटी रुपये २०२१ पासून मिळालेले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११ टक्के निधीच खर्च केला, असे का, हेही सरकारने सांगावे.

या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्यटकांची संख्या आणि पायाभूत सुविधांवरील खर्च हे दोन्ही स्वतंत्र विषय आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येवरील प्रश्नाला त्यासंदर्भातील उत्तर दिले जाणार आहे. पर्यटकांची संख्या घटलेली नाही. कोविडपूर्वी ७१ लाख देशी पर्यटक यायचे ती संख्या आता ७२ लाखांवर पोहोचली आहे.

आता सरकारने आध्यात्मिक पर्यटन, वेलनेस पर्यटन आणि निसर्ग पर्यटनावर भर दिलेला आहे. त्या संकल्पना जगभर पोहोचविण्यासाठी रोड-शो आणि जागतिक पर्यटन महोत्सवामध्ये भागीदार, सहभागी होणे आवश्यक आहे. रोड-शो केलेल्या भागातून किती पर्यटक आले याचे उत्तर परिशिष्टामध्ये दिलेले आहे.- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT