Margoa Dainik Gomantak
गोवा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Tourist fined in Goa: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहन प्रवेशास कडक बंदी असतानाही काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतात.

Sameer Amunekar

मडगाव: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहन प्रवेशास कडक बंदी असतानाही काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतात. अशाच प्रकारचा एक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. रेंट अ जीप घेऊन बाणावली समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या एका गुजराती पर्यटकाला कोलवा किनारी पोलिसांनी पकडून पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

जयेशकुमार पटेल (वय ५७, मूळ गुजरात) असे त्या पर्यटकाचे नाव असून तो आपल्या पत्नीसमवेत गोव्यात आला होता. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी भाड्याने घेतलेली जीप थेट किनाऱ्यावर नेली. या दरम्यान गस्तीवरील किनारी पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली. चौकशीत त्याने गुगल मॅपचा आधार घेऊन आपण या ठिकाणी आलो असल्याचे सांगितले.

मात्र, गोव्यात किनाऱ्यावर कोणतेही वाहन आणण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी त्याला नियमांची माहिती दिली. त्यानंतर पर्यटकावर दंडात्मक कारवाई करत ५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या घटनेमुळे पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटकांकडून वारंवार नियमभंग होत असल्याने स्थानिक नागरिकांत नाराजी आहे. किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संरक्षित ठेवण्यासाठी अशा घटनांना आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी सर्व पर्यटकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाणे हा कायद्याने गुन्हा असून त्याबाबत कुठलीही सबब ग्राह्य धरली जाणार नाही. पर्यटकांनी गुगल मॅप किंवा इतर साधनांवर अवलंबून न राहता स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT