गोवा

Goa Tourism: कुशल पर्यटक मार्गदर्शकासाठी योजना राबविणार; पर्यटनमंत्री रोहन खंवटे

Goa Tourism: ट्रॅव्हल व टुरिझम संघटनेकडून ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्‍यास सरकार प्राधान्‍य देणार असल्‍याचे मंत्र्‍यांनी सांगितले.

सुशांत कुंकळयेकर

Goa Tourism

बेकायदेशीर दलालांच्या विरोधात ठाम भूमिका मांडत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्‍याचा प्रभावीपणे प्रचार करण्याच्या उद्देशाने कुशल पर्यटक मार्गदर्शक तयार करण्याकरिता किमान आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली

ट्रॅव्‍हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोव्‍याच्‍या नवीन कार्यकारिणी स्थापित करण्यासाठी केळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात जॅक सुखिजा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पदभार स्वीकारला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खंवटे यांनी दक्षिण आणि उत्तर अशा गोव्यातील दोन्ही भागांतील बेकायदेशीर दलालांच्या निर्मूलनासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.

मोपा आणि दाबोळी हे दोन्ही विमानतळ समान संख्येने प्रवाशांना सोयी पुरवतात हे अधोरेखित करून विमानतळांच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी राजकारण्यांना केले. टुरिझम 2.0 ची संकल्पना अधोरेखित करताना खंवटे यांनी गोव्यातील पर्यटन वाढविण्यासाठी उदयोन्मुख आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा वापर करण्याच्या महत्वावर भर दिला.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार पर्यटक मार्गदर्शक बनण्‍यासाठी 12वी इयत्तेची पात्रता असलेल्‍या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. आम्ही यावर पुनर्विचार करत आहोत. आम्ही आठवी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत.

त्यांना परदेशी भाषेत खास करून इंग्रजीतून प्रशिक्षण दिले जाऊ शकते. त्यांना गोव्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव करून दिली, तर हे मार्गदर्शक गोव्याचे सर्वोत्तम ब्रँँड अॅम्बेसिडर होऊ शकतात, आम्ही निवडणूक आचारसंहिता उठविल्यानंतर हा कार्यक्रम सुरू करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रॅव्हल व टुरिझम संघटनेकडून ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्‍यास सरकार प्राधान्‍य देणार असल्‍याचे मंत्र्‍यांनी सांगितले.

गोमंतकीय संस्कृती, इतिहासाची जाणीव असलेल्या गाईड्सची गरज

संघटनेचे नूतन अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी आपल्या भाषणात सुशिक्षित आणि गोमंतकीय संस्कृती व इतिहासाची जाण असलेल्या टुरिस्ट गाईड्सची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी संघटनेची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले व यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT