Dress Code Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism 2023: आता 'या' मंदिरांमध्ये तोकडे कपडे वापरण्यास बंदी; नव्या वर्षापासून मार्गदर्शिका लागू होणार

Goa Tourism 2023: मंदिरांचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे आहे. तोकडे कपडे घालून मंदिरांत प्रवेश करणे गैर आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism 2023: कोणी कोणते कपडे वापरावेत, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. परंतु मंदिरांमध्ये देवदर्शनाला येणाऱ्यांनी भारतीय संस्कृती जपावी, संस्कृतीला अनुसरून कपडे परिधान करावेत, अशी मंदिर व्यवस्थापनाची अपेक्षा असते.

परंतु काही विदेशी पर्यटक तोडक्या कपड्यांनिशी मंदिरात येतात. याला मंदिर व्यवस्थापनाचा आक्षेप आहे. राज्यातील काही मंदिरांनी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यात आता रामनाथी येथील देव रामनाथ देवस्थानाचाही समावेश होणार असून नव्या वर्षापासून ही मार्गदर्शिका लागू होणार आहे.

राज्यात धार्मिक पर्यटनाला चालना मिळत आहे. येथील मंदिरे, चर्च यांचे सुरेख बांधकाम तसेच प्रसन्न वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

मंदिरांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. फोंडा तालुक्यातील देवस्थानांमध्ये पर्यटकांची वर्दळ जास्त असते.

अनेक विदेशी पर्यटकांचीही यात समावेश असतो. मंदिरात प्रवेश करणाऱ्यांनी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा आदर राखावा, एवढीच अपेक्षा असते.

परंतु तोकडे कपडे वापरणारे काही देशी-विदेशी पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात व मंदिरात प्रवेश करतात. याला मंदिर व्यवस्थापनाचा आक्षेप आहे. म्हणून काही मंदिरांत मार्गदर्शक सूचना प्रदर्शित केल्या आहेत.

मंगेशी येथील मंगेश देवस्थानसह अन्य काही मंदिरांत असे फलक दिसून येतात. आता रामनाथी येथील रामनाथ देवस्थानात नवीन वर्षापासून ही मार्गदर्शिका लागू होणार आहे. तसा सूचना फलकही मंदिर परिसरात लावले आहेत.

मंदिरांचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे आहे. तोकडे कपडे घालून मंदिरांत प्रवेश करणे गैर आहे. हे मंदिर परंपरेला धरून नाही. मंदिरात प्रवेश करणाऱ्यांनी परंपरेचे पालन करावे. त्यासाठी विविध देवालयांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शिकेचे मी स्वागत करतो.

- गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री.

फोंड्यातील सर्वच देवालयांनी अशा प्रकारची मार्गदर्शिका जाहीर करायला हवी. मंदिर म्हणजे धुडगूस घालण्याचे पर्यटन स्थळ नव्हे, याची जाणीव पर्यटकांना करून देणे आवश्‍यक आहे. मंगेशी तसेच रामनाथ देवस्थानने हा खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे.

- सुरेंद्र नाईक, भाविक, बांदोडा.

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ही मार्गदर्शिका जाहीर केली आहे. मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. त्याचे पावित्र्य राखणे सर्वांचेच कर्तव्य आहे.

निदान मंदिरात प्रवेश करणाऱ्यांनी भारतीय परंपरा व संस्कृतीचे पालन करावे. मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये. ते भारतीय संस्कृतीला धरून नाही.

- वल्लभ कुंकळ्येकर, अध्यक्ष, रामनाथ देवस्थान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT