Goa Tourism  Canva
गोवा

Goa Tourism: गोव्याच्या समृद्ध वारशाची झळाळी; ‘ओटीएम’मध्ये पर्यटनाच्या वचनबद्धतेचे प्रभावी प्रदर्शन

Goa tourism OTM 2025: मुंबईत ओटीएम २०२५ या प्रदर्शनाच्या यशस्वी समारोपादरम्यान गोवा पर्यटनाने शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रभावी प्रदर्शन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुंबईत ओटीएम २०२५ या प्रदर्शनाच्या यशस्वी समारोपादरम्यान गोवा पर्यटनाने शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रभावी प्रदर्शन केले. या कार्यक्रमात राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याच्या जतनावर तसेच समृद्ध वारसा आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संकल्पनांवर भर देण्यात आला.

गोवा (Goa) पर्यटनाने ओटीएम २०२५ मध्ये पुनरुत्थानशील पर्यटन संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले. ही संकल्पना पर्यावरणपूरकता आणि स्थानिक समुदायांचा समावेश करून जबाबदार पर्यटनाला चालना देते. गोवा पर्यटनाच्या सहभागातील एक मुख्य आकर्षण म्हणजे एकादश तीर्थ सर्किट असून याला ऐतिहासिक महत्त्व असलेली ११ मंदिरे पर्यटकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव प्रदान करतात. याशिवाय, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील सौंदर्य, रंगीबेरंगी सण, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि शाश्वत समुद्रकिनारा पर्यटन या सर्व महत्त्वाच्या पैलूंवर भर देण्यात आला.

गोवा पर्यटन (Goa Tourism) संचालनालयाचे संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, ओटीएम २०२५ मध्ये मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने आम्ही आनंदी आहोत. या मंचाच्या माध्यमातून आम्हाला आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि गोवा शाश्वत व पुनरुत्थानशील पर्यटनाच्या दिशेने कसा पुढे जात आहे हे दाखवता आले.

‘सर्वोत्कृष्ट सजावट’ पुरस्काराने सन्मानित

ओटीएम मुंबई २०२५ च्या अंतिम दिवशी गोवा पर्यटनाला प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट सजावट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फेअरफेस्ट मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गझनफर इब्राहिम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोवा पर्यटनाच्या प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT