Goa Tourism Arabian Travel Market 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोवा टुरिझमचा दुबईत डंका! ‘अरेबियन ट्रॅव्हल मार्केट’मध्ये सहभाग, पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न

Goa Tourism Arabian Travel Market Dubai: दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित ‘अरेबियन ट्रॅव्हल मार्केट (एटीएम) २०२५’मध्ये गोवा टुरिझमने विजयी सहभाग नोंदवला.

Sameer Panditrao

पणजी: दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित ‘अरेबियन ट्रॅव्हल मार्केट (एटीएम) २०२५’मध्ये गोवा टुरिझमने विजयी सहभाग नोंदवला. या सहभागातून मध्य पूर्व आणि त्यापलीकडे असलेल्या प्रवासी व्यापार भागधारक, माध्यमे, पर्यटन गुंतवणूकदारांना पुनरुज्जीवित आणि वैविध्यपूर्ण पर्यटन ऑफरद्वारे तेथील नागरिकांना गोव्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अरेबियन ट्रॅव्हल मार्केट हे एक आंतरराष्ट्रीय प्रवास व्यापार प्रदर्शन दरवर्षी भरविले जाते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष गणेश गावकर, ‘जीटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर,

पर्यटनमंत्र्यांचे ‘ओएसडी’ शॉन मेंडोन्सा, ‘जीटीडीसी’चे महाव्यवस्थापक लक्ष्मीकांत वायंगणकर आणि पर्यटन विभागाच्या साहाय्यक पर्यटन अधिकारी लोडोविना क्वार्दोस यांनी गोव्याच्या वैविध्यपूर्ण पर्यटन क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रवासी भागीदार, गुंतवणूकदार व माध्यमांशी संवाद साधला.

Goa Tourism

गोवा पॅव्हेलियनमध्ये स्थानिक हस्तकला आणि सांस्कृतिक सादरीकरणे देखील प्रदर्शित केली गेली. पॅव्हेलियनला भेट देणाऱ्या सेंद्रिय शेती भेट, बॅकवॉटर एक्सप्लोरेशन आणि कारागीर बाजारपेठा यासारख्या प्रामाणिक अनुभवांची ओळख करून दिली गेली.

भागीदारी झाली मजबूत

पॅव्हेलियनमध्ये कॉनकॉर्ड एक्झॉटिक व्हॉयेजेस, स्पीडबर्ड ट्रॅव्हल्स, शायनिंग सँड बीच रिसॉर्ट, डीएसके हॉलिडेज, ट्रॅव्हल अनलिमिटेड, स्पाइस रूट, ट्रॅव्हलस्मिथ, फ्रीडम हॉलिडेज, फ्लाइंग फिश, द कोकण एक्सप्लोरर्स, द अ‍ॅस्टर गोवा, लेट्स गोवा यासारख्या सहप्रदर्शकांची श्रेणीदेखील येथे होती. ‘एटीएम दुबई २०२५’मध्ये गोव्याच्या सहभागामुळे भागीदारी मजबूत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT