Goa Tourism | Cruise  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: यंदाच्या पर्यटनासाठी '60' क्रूझ जहाज अपेक्षित- रोहन खंवटे

Goa Tourism: पर्यटन उद्योगातील घटकांना सोबत घेऊन यंदाचा हंगाम ठेरणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: पर्यटनाच्या आघाडीवर पुढील सहा महिने गोव्यासाठी महत्त्वाचे आहेत. यंदाचा पर्यटन हंगाम खरोखरच चांगला असेल याची खात्री आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर राज्यात मोठ्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक येणार अशी आशा आहे. याशिवाय गोव्याला समुद्री पर्यटन मिळणार असून सुमारे 60 क्रूझ जहाज अपेक्षित आहेत, असे माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

कोरोना महामारीमुळे गेले दोन पर्यटन हंगाम वाया गेले असून विदेशी पर्यटक आले नव्हते. त्यासाठी हा हंगाम पर्यटन उद्योगासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दोन वर्षांत समुद्री पर्यटन बंद असल्याने एकही जहाज राज्यात आला नव्हता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यात साधन सुविधा निर्माण करून दर्जेदार पर्यटन गोव्याला लाभणार यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी चांगल्या सेवा देखील दिल्या जात आहेत. पर्यटन मंडळाच्या मदतीने, तसेच पर्यटन उद्योगातील घटकांना सोबत घेऊन यंदाचा हंगाम ठेरणार आहे, अशी आशा खंवटे यांनी व्यक्त केली.

‘गोवा ही देशातील भोजनाची राजधानी’

गोव्यात आता केवळ सौंदर्याला आकर्षित होऊन पर्यटक येत नसून देशातील भोजनाची राजधानी म्हणून गोवा प्रसिद्ध झाला आहे. जेवणाशीसंबंधित फूड ब्लोगर्स आणि प्रसार माध्यमांवर कार्यक्रम करणारे व्यक्ती आज गोव्यात येऊन येथील पाककृती दाखवतात. त्यामुळे आणखी पर्यटक राज्यात येत आहेत, असे खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर राज्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

SCROLL FOR NEXT