Goa Reddit Discussion Dainik Gomantak
गोवा

Viral Post: "मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही"! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत; स्थानिक म्हणाला, 'आम्ही रोज या परिस्थितीला तोंड देतोय'

Goa Reddit Discussion: सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु आहे. पण याचवेळी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत गोव्यातील सध्याच्या परिस्थितीवरून चर्चा रंगली आहे.

Sameer Panditrao

गोवा भारतातील पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु आहे. पण याचवेळी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत गोव्यातील सध्याच्या परिस्थितीवरून चर्चा रंगली आहे.

रेडिट प्लॅटफॉर्मवर एका युजरने मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही या मथळ्याखाली एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचे म्हणणे आहे की मी गोव्याच्या शांत, निसर्गरम्य वातावरणासाठी गोव्यावर प्रेम करत होतो. पण २०१० सालानंतर ही परिस्थिती बदलली.

तो म्हणतोय की आता समुद्रकिनारे गजबजले आहेत. सगळीकडे कचरा, प्लास्टिक, घाण दिसून येत आहे. मोकाट जनावरे सर्वत्र उबग आणत आहेत असे निरीक्षण त्याने नोंदवले. याचवेळी त्याने वाढत्या शॅक्ससंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत.

https://www.reddit.com/r/Goa/comments/1pw07wu/the_goa_i_love_no_longer_exists/?share_id=YK_hoJLYgwrR3qckentNW&utm_content=1&utm_medium=android_app&utm_name=androidcss&utm_source=share&utm_term=3

पुढे तो महिलांच्या सुरक्षेसंदर्भात बोलतो. तो म्हणतो, महिलांशी आणि त्यातही विशेषत: परदेशी महिलांशी काही लोक गैरवर्तन करतात. यात त्याने शॅक्सवर काम करणाऱ्या परप्रांतीय लोकांवर, त्यांची तपासणी होत नाही या मुद्दयांवर लक्ष वेधले आहे. शेवटी तो म्हणतो कि माझ्या आवड्त्या गोव्याचा ऱ्हास बघणे हृदयद्रावक आहे.

या पोस्टवरती गोव्यातील एका स्थानिक व्यक्तीने तिथे प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे की आम्ही रोज कोणत्या परिस्थितीला तोंड देतोय हे समजून घ्या. यात खाली एका पर्यटकाने योग्य निरीक्षण अशी प्रतिक्रिया देऊन सगळ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे अशी कमेंट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT