WTM London 2024 Goa Tourism
गोवा

Goa Tourism: लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटमध्ये गोव्याचा सहभाग; यूके हाय कमिश्नरांच्या हस्ते पॅव्हेलियनचे उद्घाटन

WTM London 2024: गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन सचिव IAS संजीव आहुजा यांच्या उपस्थितीत यूकेचे हाय कमिश्नर विक्रम दोराईस्वामी यांच्या हस्ते पॅव्हेलियनचे उद्घाटन

Akshata Chhatre

World Travel Market Goa Tourism Pavilion 

लंडन: गोवा टुरिझमने नुकतेच लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) मध्ये सहभागी होत परदेशात गोवा टुरिझम पॅव्हलियनचे उद्घाटन केलं. ExCeL लंडन येथे 5 ते 7 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या या कार्यक्रमात सहभागी होत गोव्याने इथल्या समृद्ध संस्कृती आणि पर्यटनाचे जागतिक स्थरावर प्रदर्शन केले.

तसेच गोवा पर्यटनाचे काही खास उपक्रम आंतराष्ट्रीय स्थरावर प्रस्तुत करण्यात आले. WTM लंडन 2024 कार्यक्रमात गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन सचिव IAS संजीव आहुजा यांच्या उपस्थितीत यूकेचे हाय कमिश्नर विक्रम दोराईस्वामी यांच्या हस्ते पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले.

WTM 2024 मध्ये गोव्याने पर्यटनाची विविध आकर्षणे, शांत समुद्रकिनारे, हेरिटेज साइट्स, वेलनेस रिट्रीट आणि ऍडव्हेंचर यांसारख्या उपक्रमांवर भर दिला.

आणि यामुळे उपस्थितांना गोव्यातील परंपरा, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनाच्या महत्वाच्या घटकांचा अनुभव घेणायची संधी मिळाली.

या कार्यक्रमात गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी समुद्रापलीकडे गोवा या विषयावर बोलताना गोव्यातील निसर्गाचे सौंदर्य जपत गोव्याच्या पर्यटनाचा विकास केला जाईल अशी माहिती दिली. तसेच समुद्रांशिवाय पर्यटनाच्या विविध घटकांवर देखील रोहन खंवटे यांनी भाष्य केले, तर राज्याच्या पर्यटन सचिवांनी जबाबदार पर्यटनावर भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT