Carnival 2025 Dainik Gomantak
गोवा

Carnival 2025: रोहन खंवटे यांनी पोस्ट केले कार्निव्हलमधील खास क्षण, पाहा VIDEO

Rohan Khaunte: गोव्यातील कार्निव्हल उत्सव 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाला आहे, ज्याची सांगता 4 मार्च 2025 रोजी होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील कार्निव्हल उत्सव 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाला आहे, ज्याची सांगता 4 मार्च 2025 रोजी होणार आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कार्निव्हल मिरवणुकीचे काही व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केले आहेत.

गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कार्निव्हल मिरवणुकीचे काही व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर केले आहेत.

रोहन खंवटे यांनी सांगितले की, "गोवा कार्निव्हल हा केवळ गोव्याचाच नाही, तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे. पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत हा सोहळा अधिक भव्य केला आहे."

गोवा कार्निव्हल हा राज्यातील सर्वात मोठा आणि भव्य सांस्कृतिक सोहळा मानला जातो. यंदाच्या कार्निव्हलमध्ये विविध रंगीत मिरवणुका, संगीत, नृत्य आणि पारंपरिक गोवन खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे प्रमुख मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेकडो स्थानिक नागरिक आणि पर्यटक सहभागी झाले आहेत.

यंदाच्या कार्निव्हलसाठी 'किंग मोमो' म्हणून बाणावलीचे क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहून "खा, प्या आणि मजा करा!" असा संदेश दिला.

याशिवाय, राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे आणि गोवा सरकारचे विविध मंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते्. कार्निव्हलच्या दरम्यान सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तसेच वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT