Tourism minister rohan khaunte on Agwad Fort Bar Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: पर्यटन मंत्री म्हणतात, आग्वाद किल्ल्यातील 'तो' बार नव्हेच..!

स्वातंत्र्यसैनिकांविषयी आम्हाला आदरच - मंत्री रोहन खंवटे

Akshay Nirmale

Tourism Minister Rohan Khaunte in Goa Assembly Session 2023 : आग्वाद किल्ला (aguada fort) हे आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. आग्वाद किल्ला ही पोर्तुगीज काळापासूनची वास्तू आहे. आम्ही तिथे स्वदेस दर्शन केले आहे. विनाकारण आग्वादमध्ये बार आहे, बार आहे, बार आहे... असे म्हटले जाते. मूळात तो बार नाहीच. आधी ते डोक्यातून काढून टाका.

स्वातंत्र्यसैनिकांची, लोकांच्या भावनांची आम्हाला कदर आहे. त्यावर विनाकारण बातम्या करून हा मुद्दा चर्चेत आणला जात आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

या वेळी आमदार वीरेश बोरकर यांनी मध्येच तिथे अल्कोहोल मिळत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आग्वाद किल्ल्यात बार असल्याचे समोर आल्यावर मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनाही धक्का बसल्याचे सांगितले. त्या परिसराचे पावित्र्य जपा, असे आलेमाव म्हणाले.

त्यावर खंवटे म्हणाले की, युरी आलेमाव यांच्या घराजवळ चर्च आणि देऊळ आहे. त्याच्या जवळच बार आहे. पुर्वीपासून आहे. त्याबाबत कुणाला काही अडचण नाही. मला त्यात फार जायचे नाही. आम्ही स्वातंस्त्रसैनिकांचा आदर केलेला आहे. आणि तो बार नाही.

दरम्यान, मंत्री खंवटे यांनी विविध मुद्यांवर उत्तर देताना बऱ्याच बाबींची माहिती दिली. ते म्हणाले की, डिजी लॉकरमध्ये कागदपत्रे ठेवता येतील. कागदपत्रे स्वतःसोबत बाळगण्याची गरज नाही. पर्यटन विभागाची 1364 ही हेल्पलाईन 24 बाय 7 सुरू आहे. बीचेसवर चार भाषांमध्ये सूचनांचे बोर्ड आहेत.

पर्यटनामुळे गोव्याची बनलेली टिपिकल ओळख बदलण्याचा प्रयत्न आहे. हिंटरलँड आणि आध्यात्मिक पर्यटनाला सरकार प्राधान्य देत आहे. पणजीत युनिटी मॉल उभारणार आहे. त्यासाठी जागा ठरवली आहे. दक्षिण काशी आणि उत्तर काशी कनेक्ट केले.

देहराडूनला थेट फ्लाईट सुरू झाली आहे. अॅग्रो टुरिझमकडेही आमचे लक्ष आहे. अॅग्रो टुरिझमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते तसेच हिंटरलँड पर्यटनातही वाढ होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: नारी शक्ती ते गरीब कल्याण! मुख्यमंत्री सावंतांनी मांडली भाजप सरकारच्या कारभाराची 4 प्रमुख सूत्रे; 12 वर्षांच्या विकासाचे भव्य प्रदर्शन

Konkan Railway: गर्दीचा खेळ खल्लास, प्रवास होणार सुपरफास्ट! कोकण रेल्वेचा 4,704 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; गोव्यातील रेल्वे सुविधांवर विशेष भर

Viral Video: "स्वतः मरणार नाहीत, पण दुसऱ्याचा जीव घेतील!", खतरनाक व्हिडिओ बघून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर; स्टंटबाज बाबाचा अजब कारनामा व्हायरल

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

SCROLL FOR NEXT