World Tourism Day Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटनातून गोव्याची कमाई किती? याचं उत्तर प्रत्येक गोवेकरांना माहिती हवे

Goa Tourism: गोवा भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. राज्यात २.५ लाखांहून अधिक लोकं कामाला आहेत. गोव्यातील नोंदणीकृत खोल्यांची संख्या अंदाजे ६५,००० ते ७०,००० च्या आसपास आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघाला सामावून घेण्यासाठी राज्याची पर्यटन पायाभूत सुविधाही सुसज्ज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism Economy

पणजी : गोवा भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. गोवा राज्यात पर्यटनात वाढ होत असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांच्या मते, गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्र दरवर्षी अंदाजे २५०० कोटी रुपयांचे योगदान देत आहे.

रोजगाराबाबत माहिती द्यायची झाल्यास पर्यटन क्षेत्रात सुमारे २.५ लाखांहून अधिक लोकं काम करत आहेत. पर्यटनस्थळ म्हणून गोव्याच्या वाढत्या लोकप्रियतेचे श्रेय गोव्यात मिळत असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांना देता येईल.

यामध्ये गोव्यातील समुद्र, मंदिरे, चर्च यांसोबतच हेरिटेज वॉक, साहसी मार्ग, हिंटरलॅण्डचा अनुभव आणि धबधबा ट्रेक अशा उपक्रमांचाही समावेश होतो. या शाश्वत पर्यटन उपक्रमांनी अनोखे अनुभव शोधणाऱ्यांच्या विस्तृत श्रेणीला आकर्षित केले आहे, असे मत सुखिजा यांनी व्यक्त केले.

सुखिजा यांनी संगितले की, गोव्यातील नोंदणीकृत खोल्यांची संख्या अंदाजे ६५,००० ते ७०,००० च्या आसपास आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघाला सामावून घेण्यासाठी राज्याची पर्यटन पायाभूत सुविधाही सुसज्ज आहे.

तथापि, पर्यटन उद्योगाच्या वेगवान वाढीमुळे अनेक आव्हानेदेखील अधोरेखित झाली असून त्या समस्यांचे निराकरण करणेदेखील आवश्यक आहे. यामध्ये रस्त्यांची देखभाल, समुद्रकिनारा स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक आणि ॲप-आधारित टॅक्सी सेवांची उपलब्धता यासारख्या समस्या पर्यटक आणि रहिवाशांसाठी चिंताजनक बनल्या आहेत.

६०० भागधारकांची शुक्रवारी बैठक

समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी, जागतिक पर्यटन दिनानिमित्त नंदनवन-खांडेपार येथे भागधारकांची बैठक होणार असून पर्यटन क्षेत्रातील ६०० हून अधिक भागधारक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

भागधारकांच्या बैठकीमुळे आवश्यक चर्चा होईल आणि गोव्यातील पर्यटन उद्योगासमोरील आव्हानांवर ठोस उपाय निघतील, अशी अपेक्षा सुखिजा यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT