Goa Tourism Award | Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : ‘गोवा पर्यटन’ला चार राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली येथे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्वीकारला सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism : देश तसेच जागतिक पातळीवर पर्यटनविषयक खास लौकीक मिळवलेल्‍या गोव्‍याला यंदा 2022 चे चार राष्‍ट्रीय पर्यटन पुरस्‍कार जाहीर झाले. दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या एका विशेष सोहळ्यात गोवा पर्यटन खात्याच्या वतीने पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते पुरस्कार स्‍वीकारले.

यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय राज्य पर्यटन मंत्री अजय भट आणि केंद्रीय पर्यटन खात्याचे सचिव अरविंद सिंह उपस्थित होते. गोव्याला चार श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. भारतातील पर्यटन स्थळाचे सर्वोत्तम नागरी व्यवस्थापन (कळंगुट) (क श्रेणी), राष्ट्रीय पर्यटन हॉल ऑफ फेम (श्रेणी केंद्रशासित प्रदेश : पर्यटनाचा व्यापक विकास), आत्मनिर्भर भारताच्या खऱ्या अर्थाने गोवा माईल्ससाठी मोबाइल टॅक्सी ॲप विकसित करून यशस्वीपणे वापर केल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान-सोशल मीडिया किंवा मोबाइल ॲपचा वापर या श्रेणीत आणि शशिकांत जाधव, एम. गुलाबलाल, रमेश गावकर आणि नितेश चेंडेकर या दृष्टी जीवरक्षक कंपनीच्या चार जीवरक्षकांना कर्तव्यात निष्ठा दाखवल्याबद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत.

मंत्री रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भट्ट आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे समर्थन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

गोव्यात पर्यटन उद्योग सर्वोत्तम करण्याचा आमचे लक्ष्य आहे. यासाठी योग्य साधनसुविधा निर्माण करण्यासाठी काम सुरू आहे. पर्यटन उद्योगातील घटकांचा यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. कारण राज्यात येणाऱ्या पर्यटकांना ‘अतिथी देवो भवः’ अशी वागणूक दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहन खंवटे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT