Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: हेरिटेज वॉक, ख्रिसमस स्पेशल आणि बरंच काही... डिसेंबरमध्ये गोव्यात येत असाल तर 'या' गोष्टी मिस करू नका!

जाणून घ्या या महिन्यात कुठे काय आहे विशेष?

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Tourism: ऑक्टोबरपासून गोव्यातील पर्यटन हंगामास सुरवात होते आणि नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी हे गोव्यातील पर्यटन शिखरावर असण्याचा हंगाम असतो.

डिसेंबरमध्ये तर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर गोव्यात पर्यटकांचा ओघ मोठा असतो. आणि येथील माहौलही अनुभवण्यासारखा असतो.

तुम्हीही जर गोव्यात डिसेंबरमध्ये येण्याचे नियोजन करत असाल किंवा येणार असाल तर या डिसेंबरमध्ये गोव्यात कुठे, काय एन्जॉय करता येईल, त्याची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

चोडण बेटावर हेरिटेज वॉक

गोव्यातील चोडण या बेटावर हा हेरिटेज वॉक 16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे. यात येथील संस्कृती, चर्चेस, कलाकृती पाहता येतील. येथे 1000 रूपये तिकीट आहे. तर विद्यार्थ्यांना 500 रूपये शुल्क असेल. तीन तासांचा हा वॉक आहे.

ख्रिसमस

गोव्यात ख्रिसमसची मोठी धुम असते. येथे बेबिंका ही पारंपरिक मिठाई बनवली जाते. येथील चर्चेस, म्युझियम सजलेली असतात. एखाद्या चर्चला भेट देता येऊ शकते. ख्रिसमससाठी सजलेल्या मार्केटमध्ये खरेदीही करता येऊ शकते.

आग्वाद म्युझियम

येथील आग्वाद पोर्ट अँड जेले येथे म्युझियम आहे. येथे 400 वर्षांचा वारसा पाहायला मिळेल. गोव्याचा स्वातंत्र्यलढा, संस्कृती, गोव्याचे लोक, जेलमधील खोल्या असे सर्व येथे समजून घेता येईल. गोव्याचा वारसा आणि इतिहास येथे कळू शकतो.

हे म्युझियम सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत खुले असते. येथे स्थानिकांना 100 रूपये, इतर भारतीय नागरिकांना 200 रूपये आणि परेदशी नागरिकांना 400 रूपये प्रवेश फी आहे.

सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल

या महोत्सवाला 15 डिसेंबरपासून सुरवात होत आहे आणि 23 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव असेल. यात संवाद, नाटक, संगीत, नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स, पाककृती, अशा विविध कला पाहता-अनुभवता येतील. यासाठी सेरेंडिपिटीच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

दिवार बेटावर बाईक रॅली

पणजी जवळील दिवार या मांडवी नदीतील बेटावर ही बाईक रॅली आयोजित केली जात आहे. साडेचार तासांच्या या प्रवासासाठी 3999 रूपये शुल्क आहे.

येथे चर्चेस, मंदिरे, खारफुटी, सुंदर गृहरचना या रॅलीत अनुभवता येऊ शकते. याशिवाय बेटावरील स्थलांतरित पक्षी निरिक्षणही असेल.

सनबर्न

गोव्यात अलीकडच्या काळात सनबर्न हा महोत्सवही प्रसिद्ध झाला आहे. यंदाही वर्षाअखेरीस वागातोर येथे हा महोत्सव होत आहे. यात सहभागासाठी सुमारे तीन हजार रूपये शुल्क असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT