Goa Beach Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ‘कम टू गोवा’ एवढ्याने दर्जेदार पर्यटक गोव्यात येणार नाहीत! Social Media वरील बदनामी थांबवण्याची गरज

Goa Beach Tourism: गोव्‍यातील पर्यटन घटावे, यासाठी काही ठरावीक घटकांकडून समाजमाध्‍यमांवर नकारात्‍मक रिल्‍स, पोस्‍ट, व्‍हिडिओ केले जातात, अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : गोव्‍यातील पर्यटन घटावे, यासाठी काही ठरावीक घटकांकडून समाजमाध्‍यमांवर नकारात्‍मक रिल्‍स, पोस्‍ट, व्‍हिडिओ केले जातात, अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु त्‍यासोबतच त्‍यातील काही व्‍यथा या वस्‍तुस्‍थितीला धरून असतात, त्‍याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

अलीकडे, गोव्यातील पर्यटनाला इतर देशांतील स्पर्धेचा सामना करावा लागतोय. कंबोडिया, बाली, व्हिएतनाम, श्रीलंका ही पर्यटनस्थळे स्वतःला आकर्षक व स्वस्त म्हणून पर्यटनासाठी पर्याय सादर करत आहेत. त्याचप्रमाणे, गोव्यातील वाढीव खर्च येथील पर्यटनावर प्रभाव टाकत आहेत.

केवळ विदेशात किंवा सोशल मीडियावर, गोव्यातील पर्यटनाविषयी जाहिरातबाजी किंवा ‘कम टू गोवा’ एवढ्याच घोषवाक्याने दर्जेदार पर्यटक गोव्यात येणार नाहीत. नाताळाचे तीन दिवस (२५, २६, २७ डिसेंबर) व थर्टी फर्स्टच्या (३१ डिसेंबर) सायंकाळी किनाऱ्यांवर गर्दी उसळली, म्हणजे गोवा हाऊसफुल्ल म्हणता येणार नाही, असे निरीक्षण अखिल गोवा शॅकमालक असोसिएशनचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना नोंदवले.

‘ते’ पर्यटक दर्जेदार म्‍हणावे का?

१. लोबो म्‍हणतात, सध्या गोव्यात देशी पर्यटकांचा खच भरलेला दिसतो. मात्र, हे पर्यटक पैसे खर्च करण्यात कंजुषी करतात किंवा त्यांचे हात कचरतात.

२. देशी पर्यटक स्वतःसोबत दारू खरेदी करून किनाऱ्यांवर येतात व दिवसरात्र दारू पिऊन किनाऱ्यावरील वाळूवर लोळत पडतात. अशा लोकांना दर्जेदार पर्यटक म्हणायचे का?

देशी पर्यटकांची गाज; विदेशींची पाठ

यंदा ‘सनबर्न’ गोव्यात आयोजित केला गेला नाही. त्‍याचे समाजातून स्‍वागत होत आहे; परंतु त्‍यामुळे खास सनबर्नसाठी निर्माण होणारी पर्यटकांची साखळी यंदा दिसली नाही, हे मान्‍य करावे लागेल.

२५ ते ३१ डिसेंबरपर्यंत मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी किनाऱ्यांवर देशी पर्यटकांची संख्या समाधानकारक होती. मात्र, विदेशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. नाताळाच्या निमित्ताने सुरू झालेल्या संगीत पार्ट्या ३१ डिसेंबरपर्यंत चालल्या. या पार्ट्यांना कसल्याच प्रकारचे कोणीही परवाने घेतले नाहीत. यासंदर्भात पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता केवळ २८, २९, ३० डिसेंबरसाठी पर्यटन खात्याअंतर्गत ‘रापणकारांचो सी फूड फेस्टिव्हल’ आयोजित केला होता. त्यासाठी आयोजकांनी संगीत वाजवण्यास परवाने घेतले. मात्र, इतर कोणीही परवाना घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

SCROLL FOR NEXT