Goa Tourism Department Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Department ने रोड शोंवर खर्च केले तब्बल 6 कोटी 10 लाख; वाचा खर्चाचा तपशील

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑक्टोबर २०२२-२३ ते मे २०२३-२४ या कालावधीत विदेशात रोड शो केले गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism Department पर्यटन खात्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑक्टोबर २०२२-२३ ते मे २०२३-२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत विदेशी सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, रोड शो केला आहे. यावर राज्य सरकारने ६ कोटी १० लाख ६२ हजार ३४९ रुपये खर्च केले आहेत.

विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे आमदर व्हेन्झी व्हिएगस यांनी विचारलेल्या लेखी उत्तरावर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यावर पर्यटन खात्याचा खर्चाचा तपशील दिला आहे.

विदेशी आणि देशांतर्गत केलेल्या कार्यक्रमांवरील खर्च त्याशिवाय विविध जाहिरातींवर, तसेच कार्यक्रमांच्या प्रायोजितक्तेवर केलेल्या खर्चाचाही तपशील दिलेला आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये पर्यटन खात्याने सिंगापूर येथे १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान दिवसांचा रोड शो केला. त्यावर ७१ लाख ९२ हजार १५९ रुपये खर्च केला आहे. त्याचबरोबर माद्रिद येथे १८ ते २२ जानेवारी २०२३ या पाच दिवसांसाठी ६९ लाख ८६ हजार १९० रुपये खर्च केले आहेत.

त्यानंतर पोर्तुगालमध्ये १ ते ५ मार्च या दरम्यान झालेल्या कार्यक्रमावर ६६ लाख ५५ हजार २०० रुपये खर्च केले आहेत. जर्मनी येथे ७ मार्च ते ९ मार्च दरम्यान झालेल्या कार्यक्रमांवर १ कोटी १८ जार २०० रुपये खर्च झाले आहेत.

मॉस्कोमधील १६ ते १८ मार्च या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी ७२ लाख ८० हजार ६०० रुपये खर्च झाले आहेत. झ्युरिच येथील १८ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या कार्यक्रमासाठी १ कोटी ५५ लाख आणि ३५ लाख (केवळ ५० टक्के दिले) खर्च आला आहे. दुबई येथील १ ते ४ मे २०२३ या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी ३९ लाख ३० हजार रुपये खर्च झाला आहे.

देशांतर्गत कार्यक्रम आणि रोड शोसाठी सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंतच्या कालावधीत पर्यटन खात्याने ४ कोटी ५ लाख २० हजार ७१६ रुपये खर्च केला आहे. त्यातील कार्यक्रमांसाठी ४ कोटी ९५ हजार रुपये खर्च आला आहे, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन व प्रवास भत्त्यावर ४ लाख २५ हजार ७१६ रुपये खर्च आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT