Goa Tourism bags Best Pavilion award at ITM Amritsar Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा पर्यटन विभागाचा अमृतसरमध्ये डंका! 'ITM 2024’ मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट दालन पुरस्कार

Goa Tourism Department: गोव्याच्या दालनाने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पुनरुत्पादित पर्यटन उपक्रम आणि विविध प्रवासी अनुभवांच्या आकर्षक प्रदर्शनाद्वारे अनोख्या पद्धतीने सादर केले

गोमन्तक डिजिटल टीम

India Travel Mart Amritsar 2024|Best Pavilion Award To Goa

पणजी: गोवा पर्यटनाने इंडिया ट्रॅव्हल मार्ट (India Travel Mart 2024) अमृतसर २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट पॅव्हेलियन (Best Pavilion Award) पुरस्कार प्राप्त करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार इंडिया ट्रॅव्हल मार्ट, आयसीएम ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, अजय गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (GTDC) उप-महाव्यवस्थापक, दीपक नार्वेकर आणि पर्यटन खात्याचे सहाय्यक संचालक, रॉडलिन मास्करेन्हास यांनी हा मान स्वीकारला.

गोव्याच्या दालनाने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पुनरुत्पादित पर्यटन उपक्रम आणि विविध प्रवासी अनुभवांच्या आकर्षक प्रदर्शनाद्वारे अनोख्या पद्धतीने सादर केले. टिकाऊ पर्यटन पद्धतींना चालना देण्यासाठी प्रतिनिधित्व आणि वचनबद्धतेनिशी संपूर्ण कार्यक्रमात अभ्यागत आणि औद्योगिक नेत्यांनाही दालनाने मोहित केले.

गुंतवणूकदारांशी नेटवर्किंगची संधी!

‘आयटीएम’ अमृतसर २०२४ (ITM Amritsar 2024) मध्ये सहभागी झाल्याने गोवा पर्यटनाला प्रमुख भागधारक, टूर ऑपरेटर आणि गुंतवणूकदार यांच्याशी नेटवर्किंग करण्याची एक उत्तम संधी मिळाली. पर्यटन क्षेत्रात नवीन भागीदारी व सहयोग शोधत असताना या दालनाने, गोव्यातील विविध आकर्षणे, वेलनेस आणि आध्यात्मिक पर्यटनापासून साहस, संस्कृती आणि स्वयंपाकासंबंधी अनुभवांवर यशस्वी प्रकाश टाकला,असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT