Stray Dogs Survey Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Stray Dog Problem: राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी पर्यटन खात्याने केलेल्या आवाहनाला शून्य प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता पर्यटन तसेच पशुसंवर्धन आणि पशुपालन खात्यांनी किनाऱ्यांवरील चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती पर्यटन खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. ही कुत्री किनाऱ्यावर येणाऱ्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांवर टोळीने हल्ला करतात. गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटना घडल्या असून, त्यात स्थानिक नागरिक आणि पर्यटक जखमी झाले आहेत.

पर्यटन खात्याने काही दिवसांपूर्वी समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन नागरिक, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि प्राणीप्रेमींना केले होते. मात्र, पर्यटन खात्याच्या या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, पर्यटन तसेच पशुसंवर्धन आणि पशुपालन खात्यांनी किनाऱ्यांवरील चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

सुरक्षा रक्षकांकडे सोपविणार सर्वेक्षणाचे काम

पर्यटन खात्याने राज्यातील प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय, किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या ‘दृष्टी’ संस्थेचे जीवरक्षक आणि इतर कर्मचारीही दिवसभर किनाऱ्यांवर कार्यरत असतात. त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणता कुत्रा चावतो आणि कोणता चावत नाही, तसेच कोणत्या कुत्र्याने आतापर्यंत किती जणांना चावा घेतला आहे, याची माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांच्याकडूनच सर्वेक्षण करून अहवाल मागविण्याचे पर्यटन खात्याने निश्चित केले आहे, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT