Sunburn Festival Goa | Sunburn Festival 2022 | Sunburn Goa 2022 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival Goa: 'सनबर्न'ला पर्यटन खात्याची परवानगी पण...दंडाची रक्कम पाहून तुम्हाला घाम फुटेल

कोरोनाच्या प्रलयकारी संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीत हा महोत्सव होऊ शकला नाही.

Pramod Yadav

Sunburn Festival 2022: गोव्यात होणारा जगप्रसिद्ध 'सनबर्न फेस्टिव्ह'ला गोवा (Sunburn Festival Goa) पर्यटन खात्याने अखेर परवानगी दिली आहे. गोव्यात 28 ते 30, 2022 दरम्यान वागातोर (Vagator) येथे हा संगीत महोत्सव होणार आहे. कोरोनाच्या प्रलयकारी संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीत हा महोत्सव होऊ शकला नाही. यावेळी या महोत्सवाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

(Goa Tourism Department granted permission to Sunburn festival in Goa)

गोवा पर्यटन खात्याने सनबर्न महोत्सवाला परवानगी देताना काही अटी आयोजकांना घातल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठा दंड चुकवावा लागणार आहे. पर्यटन खात्याने आयोजकांना 17,700 रूपये प्रोसेसिंग फी भरण्यास सांगितले आहे. तसेच, तब्बल 01 कोटी 10 लाख रूपये सुरक्षा रक्कम (Security Deposit) देखील भरण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे पर्यटन खात्याने घातलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्यास ती रक्कम जप्त केली जाणार आहे. असे पर्यटन खात्याने म्हटले आहे. दरम्यान, या अटीशर्ती कोणत्या आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही.

वर्षअखेरिस नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात हजेरी लावत असतात. त्यात डिंसेबरच्या अखेरच्या दिवसांत होणार सनबर्न फेस्टिव्हल जगप्रसिद्ध आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या तरूण तरूणींची संख्या अधिक असते. देशी-विदेशी संगीत आणि लेझर शो हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी ‘The Future Is Now’ अशी महोत्सवाची थीम आहे. दरम्यान, या फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या गैरप्रकारबद्दल देखील उलट-सुलट चर्चा केली जाते. तर, अनेक यावर टीका देखील करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT