Querim Paragliding Dainik Gomantak
गोवा

Illegal Paragliding: 30 दिवसांत एक लाख दंड भरा अन्यथा...; अवैध पॅराग्लायडिंगप्रकरणी पर्यटन खात्याची कारवाई

Querim Paragliding: केरी समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत पॅराग्लायडिंग व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीवर गोवा पर्यटन विभागाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे.

Sameer Panditrao

Querim Illegal Paragliding Fine Action

पणजी: केरी समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत पॅराग्लायडिंग व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीवर गोवा पर्यटन विभागाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे. गोवा पर्यटन व्यवसाय नोंदणी कायदा, १९८२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

केरी समुद्र किनाऱ्यावर १७ व १९ ऑगस्ट २०२४ रोजी बेकायदेशीर पॅरामोटर उड्डाणे होत असल्याचे पर्यटक पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले होते. चौकशीत ही कामे श्याम नारायण पांडे (सावंतवाडा, मांद्रे, पेडणे-गोवा) यांनी परवानगीशिवाय चालवली असल्याचे उघड झाले आहे.

संबंधित ऑपरेटरकडे वैध परवाने किंवा नोंदणी नव्हती, हे उघड झाल्याचे पर्यटन विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

संबंधितांनी ३० दिवसांत दंड न भरल्यास, पहिल्या ३० दिवसांसाठी प्रतिदिन १०० रुपये आणि त्यानंतरच्या १५ दिवसांसाठी प्रतिदिन २०० रुपये अतिरिक्त दंड लागू होईल. दंडाची रक्कम न भरल्यास, ती महसूल विभागाकडून थकबाकीप्रमाणे वसूल केली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे. पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे की, गोव्यात बेकायदेशीर पॅरामोटर फ्लाइंग आणि इतर अनधिकृत पर्यटन व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT