Arambol Beach Shack Dainik Gomantak
गोवा

Arambol Beach Shack: हरमल किनाऱ्यावरील ‘त्या’ शॅकचा परवाना अखेर रद्द! 25 लाखांचा ठोठावला दंड; मांद्रेत 11 नंतर शॅक बंद

Goa Tourism Department Action: गोवा पर्यटन विभागाने हरमल समुद्रकिनाऱ्यावर शॅक क्रमांक ४ च्या परवानाधारक गिरकरवाडा हरमल येथील मॅन्युअल एस्पिरिटोसॅंटो फर्नांडिस यांचा शॅक परवाना रद्द केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा पर्यटन विभागाने हरमल समुद्रकिनाऱ्यावर शॅक क्रमांक ४ च्या परवानाधारक गिरकरवाडा हरमल येथील मॅन्युअल एस्पिरिटोसॅंटो फर्नांडिस यांचा शॅक परवाना रद्द केला आहे. तसेच, त्यांना २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. परवानाधारकाने शॅक धोरणाच्या कलम २० अंतर्गत अटीचा भंग करून शॅक पोटभाडेकरूला दिल्याने गोवा शॅक धोरण २०२३-२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गोवा पर्यटन विभागाच्या या कठोर निर्णयामुळे किनाऱ्यावरील अटी व शर्तींचा भंग करणाऱ्या परवानाधारक शॅक चालकांना एक इशारा या कारवाईद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, मांद्रे (Mandrem) मतदारसंघातील किनारी भागातील सर्व शॅक्स रात्री ११ नंतर बंद करावेत, अशी सूचना मांद्रे पोलिसांनी व्यावसायिकांसोबत घेतलेल्या बैठकीत केली. शॅक धोरणांतर्गत हंगामी रचना, शॅक, उभारण्याच्या अटींच्या उल्लंघनाबद्दल पर्यटन खात्याने कारवाई केली. मांद्रे पोलिस निरीक्षक यांनी २७ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, हरमल समुद्रकिनाऱ्यावरील शॅक ४ चे परवानाधारक मॅन्युअल फर्नांडिस यांनी धोरणाचे कलम २० चे उल्लंघन करून शॅक भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे, असे पर्यटन खात्याने म्हटले आहे.

वादाचे पर्यवसान हल्ल्यात; अन् बांदेकरचा मृत्यू

सदर शॅकच्या ठिकाणी २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ६:४५ वा. हरमल समुद्रकिनाऱ्यावर खुर्च्या हलवण्याच्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मांद्रे पोलिस (Police) स्थानकाचे पोलिस निरीक्षकांनी दिली. अमर बांदेकर यांना जोरदार मारहाण करून जखमी करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे स्पष्ट झाले.

पर्यटन विभागाची कारवाई

२५ लाख दंड

डिपॉझिट जप्त

परवाना रद्द

शॅक पाडण्याचा आदेश

फर्नांडिस यांचा काळ्या यादीत समावेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT