Toursim Minister Rohan Khaunte In Assembly DIP
गोवा

Goa Tourism: गोवा पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप; विरोधकांच्या प्रश्नाला पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी काय उत्तर दिले?

Goa Assembly Budget Session 2025: गोव्यात पर्यटकांची आकडेवारी तसेच प्रमोशन खर्चाची माहिती न मिळाल्याने वीरेश बोरकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Pramod Yadav

पर्वरी: गोवा विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाला गुरुवारी (२६ मार्च) सुरुवात झाली. प्रश्नोत्तराच्या काळात विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार वीरेश बोरकरांनी पर्यटन खात्यात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. पर्यटन खंवटे रोहन खंवटे अनेक गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करत असून, त्यांचा पर्सनल अजेंडा असल्याचा आरोप आमदार बोरकरांनी सभागृहात केला.

गोव्याला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची देशानुसार आकडेवारी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकरांनी मागितली. बोरकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री खंवटे यांनी, "गोवा पर्यटनाबाबत नकारात्मक ट्रेंड सुरु असताना देखील देश - विदेशातील पर्यटक गोव्यात येत आहेत."

"गोव्यात देशी पर्यटक येण्याचे प्रमाण २२ टक्के आणि परदेशी पर्यटक येण्याचे ०३ टक्के वाढले आहे. यापूर्वी राज्यात केवळ रशिया आणि युकेच्या पर्यटकांबाबत बोलले जात होते दरम्यान, यात आता विविध देशांचा समावेश झाला आहे", असे खंवटे म्हणाले.

राज्यात रस्ते, पाणी (क्रूझ) आणि विमानाने येणाऱ्या पर्यटकांची आकडेवारी मोजली जाते, असे खंवटे म्हणाले. पर्यटकांची आकडेवारी न मिळाल्याने वीरेश बोरकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, बोरकरांनी गोवा पर्यटन प्रमोट करण्यासाठी रोड शो, स्टडी टूर, टेलिव्हिजन यावर किती खर्च केला याची माहिती मागितली.

तसेच, कोण कोणते टार्गेट केल्याचा प्रश्न बोरकरांनी उपस्थित केला. गोवा पर्यटन खाते सांस्कृतिक पर्यटन प्रमोट करण्यासाठी प्रयत्नशील असून, शिगमो, कार्निव्हल यासह सांव जाव, चिकल काला, बोंदेरा, डेस्टिनेशन वेडिंग आणि वेलनेस टुरिझम अशा गोष्टी प्रमोट करत असल्याचे खंवटे म्हणाले.

पर्यटन अपग्रेडेशनसाठी किती खर्च करण्यात आला, नव्या किती पर्यटन स्थळांचा शोध घेतला आणि पायभूत सुविधांच्या विकासासाठी किती खर्च केले, असा प्रश्न बोरकरांनी विचारला. यावर विधानसभेच्या नियमानुसार उत्तर देता येणार नाही, असे उत्तर मिळाल्याने बोरकर आक्रमक झाले.

तसेच, त्यांनी पर्यटन खात्यात भ्रष्टाचार आणि ४२० सुरु असल्याचा आरोप केला. यावरुन मंत्री खंवटे आणि आमदार बोरकर यांच्या शाब्दीक युद्ध पाहायला मिळाले. बोरकरांनी सभापतींच्या हौदात जात खंवटे कडून मिळालेल्या उत्तरावर आक्षेप नोंदवला.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी मध्यस्थी करत आमदारांनी मुद्देसुद प्रश्न विचारावा जेणेकरुन मंत्र्याला उत्तर देणे सोपे जाईल, असे म्हटले. तसेच, ज्येष्ठ मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सर्व सदस्यांनी सभागृहात पावित्र्य राखण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT