गोवा

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Goa News Updates in Marathi: संत फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शन, चित्रपट महोत्सव, गुन्हे, राजकारण, पर्यटन यासह गोव्यातील ठळक बातम्या.

Pramod Yadav

महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

सर्वांच्या सहकार्याने हे यश मिळवणं शक्य झालं, महाराष्ट्रातील निकाल हा प्रत्येक कार्यकर्त्याचे कष्ट आहेत तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील निकालावर सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया.

Sankhali Yuva Utsav 2024: साखळीत युवा उत्सवाचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळी युवा उत्सवाचे उद्घाटन पार पडले.

एक लाख किंमतीचा गांजा बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तरुणाला अटक

एक लाख १० हजार किंमतीचा १.१ किलो गांजा बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्रातील याज्ञेश वावरे (२६, रा. महाराष्ट्र) याला मोरजी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, राजस्थानच्या तिघांना अटक

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्हापसा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी राजस्थान येथून तिघांना अटक केली आहे. जुहारा राम (२३) , नारायणलाल चौधरी (३५) आणि काळुराम (१९) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांकडून यावेळी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ळुपर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

पर्वरीत (GA-02-J-4531) बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात कार जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास केला जात आहे.

कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन वाहनांची अडवणूक करुन राडा करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या पर्यटकाला अटक करण्यात आली आहे. गिरजेश बघेल (३१, उत्तर प्रदेश) असे या पर्यटकाचे नाव असून, कळंगुट पोलिसांनी त्याला अटक केलीय.

म्हाऊस पंचायतीसाठी कचरा वाहनांचे आमदार राणे यांच्या हस्ते लोकार्पण

म्हाऊस पंचायतीच्या कचरा वाहनांचा आमदार डॉ देविया राणे यांच्या हस्ते उद्घाटन. कचरा गोळा करण्याच्या कामाला मिळणार गती. पंचायत मंडळाची उपस्थिती.

बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणारा राजवीर राजेश मांद्रेकर काणका - पर्रा येथे आढळून आला आहे. याप्रकरणी हणजूण पोलिस अधिक तपास करत आहेत.

शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

शापोरा – हणजूण येथून राजवीर राजेश मांद्रेकर दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणाला सापडल्यास 9075188018 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

प्रदूषण मंडळाने शापोरातील दोन नाईट क्लब सील केले आहेत. ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT