Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Manish Jadhav

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या असणाऱ्या जीपमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून उभ्या असणाऱ्या जीपमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

गोवा विद्यापीठाची प्राध्यापक भरती वादात; गोवा फॉरवर्डकडून कुलगुरूंना घेराव

गोवा विद्यापीठातील 'स्कूल ऑफ अर्थ ओशन अ‍ॅण्ड अ‍ॅटमोस्पेरीक सायन्स' अध्ययन शाखेत प्राध्यापकांच्या भरतीसाठी दोनदा परिपत्रक काढण्यात आले. पात्र गोमंतकीय उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.

असे असतानाही पुन्हा अधिसूचना काढत नव्याने मुलाखती घेण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले व या मुलाखतींसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी पंधरा वर्षे रहिवासी दाखला तसेच राजभाषा कोकणीची अनिवार्यता अट शिथिल केली असल्याने गोवा फॉरवर्डच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी घेराव घालत जाब विचारला.

गोवा-रामनगर रस्त्यावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा!

गोवा-बेळगांव महामार्गावरील अस्तुली पुलाजवळ बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून वाहने अडकून पडल्याने गोवा-रामनगर वाहतूक ठप्प. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटरच्या रांगा. स्थानिकांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू.

सिनियर महिला T20; गोव्याचा महिलांची विजयी सलामी!

सिनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा जम्मू-काश्मीर संघावर आठ विकेट राखून विजय. पूर्वजा वेर्लेकर व तरन्नुम पठाण यांची चमक.

गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता, दोन दिवस यलो अलर्ट

गोव्यात आज - उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

उसगाव येथे बुडालेल्या पाचवीतील मुलाचा मृतदेह अखेर सापडला

मुसळधार पावसात उसगाव येथे ओहोळाच्या पाण्यात बुडालेल्या दर्शन नार्वेकर (११) या पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह खांडेपार, दुधसागर नदीत सापडला आहे. बुधवारी सायंकाळी ट्युशनवरुन माघारी घेताना दर्शन ओहोळात बुडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याचा शोध घेतला जात होता.

गोवा पोलिसांचे ऑपरेशन मिलाप; तिघांची कुटुंबियांसोबत घडवली भेट

उत्तर गोवा पोलिसांनी ऑपरेशन मिलाप अंतर्गत विष्णू, सोनू आणि गिल्बर्ट यांना त्यांच्या वाळपई, पर्वरी आणि साळगाव येथील त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली.

पुरात बुडालेल्या पाचवीतील मुलाचा अद्याप थांगपत्ता नाही, शोध सुरुच

तिस्क, उसगाव येथे पुराच्या पाण्यात बुडालेल्या पाचवीतील मुलाचा शोध अजून लागलेला नाही. अग्निशामक दलाकडून शोध जारी.

राज्यात परतीच्या पावसाचं धूमशान; समुद्राच्या पातळीत वाढ

राज्यात परतीच्या पावसानं हाहाकार उडवला आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. समुद्राच्या पातळी वाढ झाली असून माजोर्डा येथील शॅक्सना फटका बसला आहे.

शिवोलीत हणजूण पोलिसांची छापेमारी; ड्रग्जसह कॅमेरुनच्या नागरिकास अटक!

शिवोलीत हणजूण पोलिसांनी छापेमारी करुन 65 हजारांच्या ड्रग्जसह अडीच लाखांची रोकड जप्त केली. संशयित इमॅन्युअल फॉन (वय, वर्ष 40) या कॅमेरुन नागरिकास पोलिसांकडून अटक.

पर्यटन हंगाम सुरु होताच कळंगुटमधील रेस्टॉरंट आणि क्लब व्यवस्थापकांसोबत समन्वय बैठक

उत्तर गोव्याचे एसपी उत्तर अक्षत कौशल, पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश कर्पे आणि पीआय राहुल परब यांनी कळंगुट पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील क्लब मालक/व्यवस्थापकांशी समन्वय बैठक घेतली.

मुसळधार पावसामुळे पाचवीत शिकणारा शाळकरी मुलगा बुडाला!

अकस्मात आलेल्या धुवांधार पावसामुळे दर्शन नार्वेकर हा ११ वर्षीय मुलगा नाल्याच्या पाण्यात वाहून जाण्याची दुर्घटना आज बुधवारी संध्याकाळी उसगावात घडली. सदर बालक साईनगर तिस्क या भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

तिस्क-उसगाव येथील साईनगर परिसरात ही घटना घडली असून ट्यूशनहून परतत असलेल्या या मुलाला नाल्यामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो नाला पार करत असताना वाहून गेला.

फोंडा येथील अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत अविरतपणे सुरू होते. मात्र, सदर बालकाचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

Goa-Maharashtra Coastline Security: सागरी सुरक्षेसाठी...! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दलाचा सराव

SCROLL FOR NEXT