Goa Daily News Wrap | Marathi Breakings 
गोवा

Goa's Daily News Wrap: गोव्यातील क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा

Goa Today's Live News Update: म्हापसा मासळी महिला विक्रेत्या अन् आरटीआय कार्यकर्त्याचा वादावर पडदा!

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटूंना 'एनसीए'त मार्गदर्शन करण्याची संधी

गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू स्वप्नील अस्नोडकर व शदाब जकाती, तसेच निनाद पावसकर, विवेक मिश्रा आणि सलमा दिवकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

बेती यथे किराणा व मोबाईल दुकानाला आग

बेती यथे किराणा व मोबाईल दुकानाला आग. दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे 3.5 लाखांचे नुकसान.

पत्रादेवी तपास नाक्यावर सुमारे 43 लाखांची दारु जप्त

पत्रादेवी तपास नाक्यावर सुमारे 43 लाखांची दारु जप्त. अबकारी विभागाची कारवाई.

गेल्या महिन्यात सुमारे 420 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आल्याची माहिती.

म्हापसा मासळी महिला विक्रेत्या अन् आरटीआय कार्यकर्त्याचा वादावर पडदा!

म्हापसा मासळी मार्केटमधील महिला विक्रेत्या अन् एका आरटीआय कार्यकर्तामधील वाद अखेर मिटला.

बुधवारी बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर याप्रकरणी सुनावणी झाली असता हे प्रकरण सामजस्याने सोडविण्यात आले. आज विक्रेत्यांनी सकाळच्या सत्रात मार्केट बंद ठेवत सुनावणीला हजेरी लावलेली.

फातोर्डा परिसरात एकाची आत्‍महत्‍या

फातोर्डा पाेलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत राहणाऱ्या एका इसमाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. त्याचे नाव शिवाजी वर्कट (६५) असे असून फातोर्डा येथील आनंदवन अपार्टमेंट येथे तो राहत होता. गळफास घेतलेल्‍या अवस्‍थेत कुटुंबियांनी शिवाजी वर्कट यांना पाहिले तेव्‍हा त्‍यांना खाली उतरवून मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात नेले. मात्र, डॉक्‍टरांनी शिवाजी वर्कट यांना मृत घोषित केले.

राज्यात तापमानाचा पारा ३४ अंशांवर!

Temp In Goa

राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रखरखत्या उन्हामुळे पशू-पक्षीदेखील हैराण झाले आहेत. राज्यातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही गोवा वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, गेले चार-पाच दिवस राज्यातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. आज पणजीत कमाल ३२.७ अंश सेल्सिअस तर किमान २४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मडगाव येथे कमाल ३४ अंश सेल्सिअस तर किमान २४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

मडगाव रेल्वे स्थानकावर १८ हजारांची दारू जप्त

मडगाव रेल्वे स्थानकावर आज पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केली असता तिघांकडे दारूच्या बाटल्या सापडल्या.

ही एकूण दारू ११२ लिटरच्या आसपास असून त्याची किंमत १८ हजार रूपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीच्या प्रकरणात उत्तर प्रदेश येथील दोघांना आणि एका नेपाळी व्यक्तीचा सामावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, तांत्रिक कारणामुळे पोलिसांनी त्यांची नावे जाहीर केली नाहीत.

सिदनाळ खून प्रकरणी संशयितांना न्‍यायालयीन कोठडी

Goa Murder Case

प्रेमसंबंधात अडथळा येत असल्‍यामुळे आपल्‍या प्रियकराच्‍या मदतीने आपला पती विश्‍वनाथ सिदनाळ याचा खून करण्‍याचा आरोप असलेले वैभवी सिदनाळ आणि तिचा प्रियकर सूरज मुगेरी या दोघांच्‍याही पोलिस कोठडीचा रिमांड संपल्‍याने त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली. सध्‍या या संशयितांना कोलवाळ तुरुंगात स्‍थानबद्ध करण्‍यात आले आहे.

२४ एप्रिल रोजी पेड-बाणावली येथे हा खून झाला होता. सिदनाळ हा टाईल्‍स फिटिंगचे काम करायचा आणि पेड-बाणावली येथे एका भाड्याच्‍या खोलीत तो राहात होता. याच खोलीत रात्री त्‍याला दारू पाजून बेशुद्ध करण्‍यात आले आणि नंतर त्‍याच्‍या डाेक्‍यावर फावड्याने प्रहार करून त्‍याचा खून करण्‍यात आला हाेता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT