Mayem Yatra
Mayem Yatra Dainik Gomantak
गोवा

Goa News Update: पुन्हा कला अकादमी चर्चेत, NDA ची बैठक, गुन्हे आणि राज्यातील इतर बातम्यांचा आढावा

Pramod Yadav

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून कला अकादमीच्या कामाची चौकशी व्हावी - आप

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून कला अकादमीच्या कामाची चौकशी व्हावी अशी आपची मागणी. राजदीप नाईक हे गोव्याच्या मातीतले सच्चे कलाकार आणि जनतेच्या पैशांचा गैरवापर केल्याबद्दल जाब विचारण्याचा हक्क सर्वांनाच आहे.

गोविंद गावडेंच्या 'राजदीप नाईक कोण?' या वक्तव्यावर आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड अमित पालेकर यांची प्रतिक्रिया.

'रेड्या'च्या जत्रेसाठी माशेलहून जलमार्गे तरंगांचे मयेत आगमन

'रेड्या'च्या जत्रेसाठी माशेलहून जलमार्गे तरंगांचे मयेत आगमन. श्री देवकीकृष्ण, पिसो रवळनाथ आणि श्री पुरुष देवांच्या तरंगांचे स्वागत. श्री माया केळबाय पंचायतन देवस्थानची जत्रा मध्यरात्रीनंतर होणार साजरी.

Mayem Yatra

खलप म्हणतात, पर्रीकरांमुळे म्हापसा अर्बनची अशी स्थिती

Mapusa Urban Scam

म्हापसा अर्बन बँक स्थापन केल्यानंतर या बँकेतून कर्ज देताना आम्ही सर्व ती खबरदारी घेतली होती. योग्य सुरक्षा हमी घेऊनच कर्ज देत वसूली करीत होतो.

परंतु स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून ही बँक आम्ही सर्व संचालक मंडळाने राजीनामा देऊन त्यांच्या हातात दिली. पर्रीकरांनी पाच वर्षे ही बँक चालवली आणि तिची आज जी काही स्थिती आहे ती सर्वांसमोर आहे.

खलप साखळी येथे प्रचार सभेत बोलत होते. खलपांच्या या वक्तव्यामुळे आता म्हापसा अर्बनचा वाद वाढण्याची शक्यता आहे.

30 लाख सरकारी नोकऱ्या आणि 5 हजार कोटी स्टार्ट-अप फंड, काँग्रेसची वचनबद्धता -  एल्टन डिकोस्ता

युवा प्रशिक्षणार्थीसाठी वर्षाला एक लाख, 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि 5 हजार कोटी स्टार्ट-अप फंड, पेपर लीक बंदीसाठी कायदा, ही युवकांसाठी काँग्रेसची वचनबद्धता आहे, असे केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले.

गोव्यात भाजपला महिलांची अधिक मते मिळतील - मुख्यमंत्री

Goa Loksabha Election

गोव्यात भाजपला महिलांची अधिक मते मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

वाळपईत नदीत बुडून एकाचा मृत्यू

वाळपई नवोदय विद्यालयाजवळ असलेल्या नदीत बुडून अग्नेल फर्नांडीस वय (44) मूळ कर्नाटक याचा मुत्यू.

माडेल-थिवी येथून एकाचे अपहरण आणि मारहाण; राजस्थानच्या तिघांना अटक

Goa Crime News

माडेल-थिवी येथून एकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली मात्र, पैसे न मिळल्याने अपहरणकर्त्यांनी त्याची अंगठी, मोबाईल आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी राजस्थानच्या तिघांना अटक केलीय.

Goa Crime News

भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

"काँग्रेस किंवा कोणा एका पक्षाची नव्हे तर ही निवडणूक इंडिया आघाडीची आहे. 2014 साली त्यावेळचे सरकार योग्य कारभार करत नसल्याने भाजपला पाठिंबा दिला. गेल्या दहा वर्षात भाजपचा कारभार पाहिला असून, त्यांना आता सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय. सत्तेत आल्यावर भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात डांबा, असे माझे इंडिया आघाडीला आवाहन आहे." मिकी पाशेको यांचे वक्तव्य.

Mickky Pacheco

NDA ची पणजीत बैठक सुरु

NDA ची पणजीत बैठक सुरु झाली असून, याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, तेंडुलकर, सुदिन ढवळीकर, दिपक ढवळीकर, जीत आरोलकर, आलेक्स रेजिनाल्ड उपस्थित आहेत.

म्हादई, रेल्वे दुपदरीकरण आणि कोळसा, खाण यासारख्या समस्यांना काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप सुदिन ढवळीकर यांनी केला.

विजय सरदेसाई यांनी काँग्रेस का सोडली? मनोज परब यांचा सवाल

Manoj Parab On Vijai Sardesai

विजय सरदेसाई यांनी काँग्रेसला रामराम ठोकून गोवा फॉरवर्ड का स्थापन का केली. त्यांनी काँग्रेसची मते फोडली नाहीत का? २०१७ मध्ये जिंकून आल्यानंतर काँग्रेसला सोडून सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला का साथ दिली? असा सवाल आरजीच्या मनोज परब यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : ‘कल्‍की’मध्‍ये चमकतोय गोमंतकीय ‘ध्रुव’ तारा; छोडी पण महत्वपूर्ण भूमिका

Vijay Sardesai : विजय सरदेसाई यांनी ऐकली काणकोणवासीयांची गाऱ्हाणी

Mapusa Municipal Market : म्हापशात भिकाऱ्यांमध्ये वाढ; समस्या सोडवण्याची मागणी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT