गोवा

Goa Top News: देवडी खून प्रकरण, व्हॅटमध्ये वाढ; गोव्यातील आजच्या ठळक बातम्या

Goa Today's 21 June 2024 Live News: गोव्यातील गुन्हे, राजकारण, कला - संस्कृती, क्रीडा, अपघात यासह दिवसभरात घडणाऱ्या ठळक घडामोडी.

Pramod Yadav

Goa Murder Case: देवडी खून प्रकरण : संशयित आरकेला अटक

गणेशपुरी, म्हापसा येथे झालेल्या अहमद देवडी या तरुणाच्या कथित खूनप्रकरणात मागील २३ दिवसांपासून फरार असलेला संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आरके याला आंबोली, महाराष्ट्रातून अखेर गजाआड केले. संशयित फरार असल्याने म्हापसा पोलिस टीकेचे धनी बनलेले.

Goa News: अग्निशमन दलासाठी तीन नवे बंब, मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

Heavy Rain Alert In Goa: पुढील चोवीस तास गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा

जाहिरातींच्या होर्डिंग्सप्रकरणी गोवा खंडपीठाचे निर्देश

महामार्गाच्या बाजूने व उंच इमारतींच्या गच्चीवर उभारण्यात आलेल्या जाहिरातींच्या होर्डिंग्सप्रकरणी तसेच वीज खांबांवर लावलेल्या जाहिरात फलकप्रकरणी गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वाहतूक पोलीस अधीक्षकांना कारवाई संदर्भातची माहिती देण्याचे निर्देश दिले.

वीज खांबांवर जाहिरात फलक लावण्यास निविदा दिलेल्या कंत्राटदाराला व राजदीप बिल्डर्सला नोटीस जारी करून खंडपीठाने पुढील सुनावणी शुक्रवारी २८ जूनला ठेवली आहे.

Goa Petrol Diesel Prices: पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात आलेमाव यांचा आंदोलनाचा इशारा

शासनाने ही (पेट्रोल - डिझेल) दरवाढ मागे न घेतल्यास आम्ही आंदोलन करू. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सुबुद्धी येईल आणि गोमंतकीयांना रस्त्यावर येण्यास ते भाग पाडणार नाहीत अशी आशा मी बाळगतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

Goa Petrol Diesel Prices: गोव्यात पेट्रोल एक रुपया तर डिझेलसाठी 36 पैशांनी महागले

गोव्यात शनिवारपासून (22 जून) पेट्रोल एक रुपया आणि डिझेल 36 पैशांनी महागणार आहे.

Goa Theft Case: खांडेपार येथील शिवलिंग मंदिरात फंड पेटी चोरी करण्याचा प्रयत्न, एकास अटक

खांडेपार येथील शिवलिंग मंदिरात फंड पेटी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी गुरुवारी रात्री वृषभ गावडे (२०, बागवाडा - खांडेपार ) याला केली अटक.

Theft In Mapusa: एकतानगर हाउसिंग बोर्ड, म्हापसा येथील बंद फ्लॅट फोडला

एकतानगर हाउसिंग बोर्ड, म्हापसा येथील एका इमारतीमधील बंद फ्लॅट फोडला. कपाटमधील काही पैसे चोरी. म्हापसा पोलिसांकडून पंचनामा.

Bicholim: व्हाळशी तळ्यातील 'ती' मगर अखेर जेरबंद

डिचोली शहरातील व्हाळशी तळ्यातील 'ती' मगर अखेर पिंजऱ्यात अडकली. गुरुवारी रात्री मगर फसली. लोकवस्तीजवळील तळ्यात आणखी मगरी असल्याचा स्थानिकांचा अंदाज.

Thivim Fire Case: थिवी येथील गोठ्याला आग; सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान

धामेडे, थिवी येथील प्रेमानंद मालवणकर यांच्या गोठ्याला आग. म्हापसा अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवाने 12-15 म्हैशींना सुखरुप वाचवण्यात यश. सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT