Goa Marathi Academy Dainik Gomantak
गोवा

मराठी - कोकणी वाद! राजभाषा कायद्यात यापुढे कसलाच बदल होणार नाही, CM सावंतांचे आश्वासन; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Live Updates: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध घडामोडींचा आढावा.

Pramod Yadav

विद्यार्थ्याला मारहाण; दोन शिक्षिकांविरुध्द गुन्हा दाखल

कामुर्ली येथील एका प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोघा महिला शिक्षिकांविरुध्द केला गुन्हा दाखल. ही घटना काल सोमवारी घडली. वहीची पाने फाडल्याने विद्यार्थ्याला पट्टीने मारहाण केल्याचे समजते.

राजभाषा कायद्यात यापुढे कसलाच बदल होणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सध्या सुरु असलेल्या मराठी - कोकणी भाषावाद संबंधी मराठी अकादमीच्या मंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट. राजभाषा कायद्यात यापुढे कसलाच बदल होणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठी अकादमीला दिले असल्याचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले.

लाभार्थींना फक्त एकाच महिन्याचे देयक, भाजपचा नवा जुमला; आलेमाव

चतुर्थीपूर्वी सर्व लाभार्थींना त्यांची थकबाकी मिळणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केले होते. परंतु DSSS आणि गृह आधार लाभार्थ्यांना फक्त एकाच महिन्याचे देयक मिळाल्याचा मेसेज आला. त्यामुळे भाजप यांचा आणि एक जुमाला समोर आला असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या सोशल मीडियावर ट्विट करून सरकारवर निशाणा साधला

माहिती आयुक्त बर्वे यांची निवड 24 तासात मागे घ्या; काँग्रेस आक्रमक

गोवा सरकारने आत्माराम बर्वे यांची (SIC) राज्याचे माहिती आयुक्तपदी निवड करून RTI कायद्याची मोडतोड केली आहे. पक्षाचा कार्यकर्ता ते मुख्यमंत्र्यांचा OSD अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. त्यांची निवड मुख्यमंत्र्यांनी २४ तासात मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गोवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केली आहे.

मुले खाईनात अंगणवाडीतून दिले जाणारे खाद्यपदार्थ

अंगणवाडी विध्यार्थ्याना देण्यात येणारे खाद्यपदार्थतील भरलेली पाकीटे पालक फेकतात रस्त्यावर. मुले खात नसल्याच्या तक्रारी. संबंधित खात्याने लक्ष देण्याची मागणी.

मुर्गे-साकोर्डा मुख्य रस्त्यावर झाड कोसळले, रस्ता वाहतुकीस बंद

मुर्गे-साकोर्डा मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद.वाहनचालकांची गैरसोय.अग्नीशामक दलाला पाचारण.

तीन महिन्यांपूर्वी हॉटमिक्सिंग, पुराच्या पाण्यात रस्ता गेला वाहून

तीन महिन्यांपूर्वी (मे महिन्यात) हॉटमिक्सिंग केलेला सावर्डे मतदारसंघांतील मधलावाडा साकोर्ड्यातील रस्ता रगाडा नदीच्या पुराच्या पाण्यात गेला वाहून. निकृष्ट दर्जाचे हॉटमिक्सिंग झाल्याचा आरोप करत स्थानिकांकडून कंत्राटदाराच्या चौकशीची मागणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: ..समस्या सोडवा अन्यथा चक्का जाम आंदोलन! गोवा कॉंग्रेसचा इशारा; डिचोली IDC तील रस्ता खड्डेमय

Comunidade Land: नगर्से कोमुनिदादीची जमीन दिल्‍लीतील पार्टीच्‍या घशात! स्‍थानिकांचा आरोप; सरदेसाईंनी वाचा फोडण्‍याची मागणी

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

SCROLL FOR NEXT