Goa Live News: उत्तर गोवा जिल्हा पंचायत: भाजपची नामांकने जाहीर

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या बातम्या
Goa Live Updates
Goa Live UpdatesDainik Gomantak

उत्तर गोवा जिल्हा पंचायत: भाजपची नामांकने जाहीर

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत निर्भेळ यश मिळवल्यानंतर, भाजपने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या धुरा कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली.

प्रमुख नामांकने:

अध्यक्ष: रेश्मा संदीप बांदोडकर

उपाध्यक्ष: नामदेव चारी

उत्तर गोव्यासोबतच दक्षिण गोव्यासाठीही भाजपने नावे निश्चित केली आहेत:

  • अध्यक्ष: सिद्धार्थ गावस देसाई

  • उपाध्यक्ष: अंजली वेळीप

जागृत पर्यावरण प्रेमींसोबत; आमदार आरोलकर यांनी दिली ग्वाही

चेंज ऑफ झोन या प्रकरणी आम्ही आंदोलनही उभारले होते. आपली पूर्ण मतदार संघात चेंज ऑफ झोनं जमीन बदलण्यास आपला विरोध आहे ज्या पद्धतीने हरमल येथील जागृत पर्यावरण प्रेमींनी मशाल मिरवणूक काढली आपण त्यांच्यासोबत असणार असल्याची ग्वाही आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

"उत्तर गोवा काँग्रेस ब्लॉक 'डान्स बार' आणि 'वेश्याव्यवसाय' समर्थकांच्या हाती"; माजी आमदार ॲग्नेलो फर्नांडिस यांचा घरचा आहेर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार ॲग्नेलो फर्नांडिस यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. उत्तर गोवा काँग्रेसचा ब्लॉक सध्या अशा व्यक्तीकडून चालवला जात आहे, जो डान्स बार आणि वेश्याव्यवसायासारख्या अवैध कृत्यांना समर्थन देतो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

अॅग्नेलो फर्नांडिस यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाच्या प्रतिमेला तडे देणाऱ्या अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी असा इशारा दिला की, "जर पक्षाने यावर पुरावे मागितले, तर मी ते सादर करण्यास तयार आहे आणि संबंधित व्यक्तीचे नावही जाहीरपणे उघड करेन."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com