Goa Police Dainik Gomantak
गोवा

गोळीबारात युवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांना जाग, चिंचमळ परिसरातील घरांची तपासणी; गोव्यातील ठळक बातम्या

Live Goa News Blog 27 December 2024 breakings : सनबर्न संगीत महोत्सव, थर्टी फर्स्ट, मनमोहन सिंग यांचे निधन यासह गोव्यातील क्रीडा, पर्यटन, राजकारण क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भागवत सप्ताहाला मोठा प्रतिसाद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातर्फे हाऊसिंगबोर्ड साखळी येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

पाटवळ सत्तरीतील घटनेनंतर वाळपई पोलिसांना जाग, चिंचमळ परिसरातील घरांची तपासणी

पाटवळ सत्तरी येथे शिकारीसाठी गेलेल्या युवकाला गोळी लागून मृत्यू येण्याच्या घटनेनंतर वाळपई पोलिसांना आली जाग. न्यायालयीन कोठडीत असलेल्या मृत युवकांच्या साथिदारांनी दिलेल्या जबानीवर वाळपई पोलिसांकडून म्हाऊस चिंचमळ परिसरातील प्रत्येक घराची तपासणी सुरू. बाबू उमर संगार आनी गावूस नूर अहमद पटेल हे दोघेही गोळीबार प्रकरणात आहेत न्यायालयीन कैदेत.

देशांतर्गत सर्वोत्कृष्ट विमानतळ असण्याचा पुरस्कार मोपाने जिंकला

गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने ट्रॅव्हल लेझर इंडियाज बेस्ट अवॉर्ड्स 2024 मध्ये "बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट" पुरस्कार जिंकला आहे.

कळंगुट बीचवर बेकायदेशीर स्कुबा डायव्हिंगचा व्यवसाय

कळंगुट बीचवर बेकायदेशीर स्कुबा डायव्हिंगचा व्यवसाय परवानगीशिवाय चालतात, ते पर्यटकांकडून जादा शुल्क आकारतात तसेच फूटपाथवर कचरा टाकत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. कळंगुटच्या आमदारांनी घटनास्थळी भेट देऊन विक्रेत्यांना स्वच्छता राखण्याच्या आणि डस्टबिन उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

म्हापसा येथे 4 किलोचा गांजा जप्त

म्हापसा येथे ४ लाख रुपये किमतीचा, ४ किलो वजनाचा गांजा अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी रंगेहात पकडलेल्या मजूर श्याम चव्हाण (२२, वास्को) याला गुन्हे शाखेने अटक केली.

आके येथील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

आके येथील पंचायतीने मडगाव केपे येथील रस्त्याच्या कडेला असलेली सर्व बेकायदेशीर बांधकामे पडायला सुरुवात केली आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन; सात दिवसांचा शोककाळ

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले आणि त्यांच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२४ पर्यंत देशभरात सात दिवसांचा राजकीय शोक पळाला जाणार आहे. रात्री राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि दरम्यान कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नसल्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. सिंग यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा सावंत यांनी उल्लेख करत इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल, असे म्हटले आहे.

Goa Accident:  नुवेत रस्ता क्रॉस करताना ज्येष्ठ महिलेचे निधन

नुवेत रस्ता क्रॉस करताना ज्येष्ठ महिलेचे निधन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुचाकी चालकाने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. दुचाकी चालक जोराने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने तसेच, मणक्याला इजा झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी आके मडगाव येथील आशिष विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT