bjp  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भाजप मंडळ अध्यक्ष निवड, मूळ कार्यकर्ते नाराज? वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: नवीन वर्षाचे स्वागत, अधिवेशन, अर्थसंल्प, गुन्हे, राजकारण, क्रीडा, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडी.

Pramod Yadav

Goa BJP: भाजप मंडळ अध्यक्ष निवड, मूळ कार्यकर्ते नाराज?

भाजप मंडळ अध्यक्षांची नावे जवळ जवळ निश्चीत. लवकरच होणार एकएकाची घोषणा‌. मंडळ अध्यक्ष निवडीत पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून आयात आमदारांच्या मर्जीतील लोकांची निवड केल्याने भाजपचे मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी.

Goa Accident: आगाळी फातोर्डा येथे कारची दुचाकींना जोरदार धडक; पोलिसांकडून तपास सुरु

आगाळी फातोर्डा येथे चौगुले महाविद्यालयानजिक कारची दुचाकींना जोरदार धडक. पीडितांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून तपास सुरु

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आढावा बैठक; विविध विषयांवर चर्चा

16 व्या वित्त आयोगाच्या गोवा दौऱ्याच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. गोव्याच्या आर्थिक गरजा, राज्य-विशिष्ट प्रकल्प प्रस्ताव आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी वाढीव निधीवर प्रकाश टाकून राज्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या सादरीकरणावर मुख्य चर्चा झाली. गोवा सरकार 16 व्या वित्त आयोगाकडून अंदाजे रु 28,000 कर निधीची शिफारस करेल.

रात्रीची खनिज वाहतूक तूर्त 'होल्ड'वर..; पिळगाववासीय पुन्हा आक्रमक

रात्रीची खनिज वाहतूक नकोच. पिळगाववासीय निर्णयावर ठाम. उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेली बैठक तापली. खाण खात्याचे संचालक सरकारच्या हातचे बाहूले. ग्रामस्थांचा आरोप. खाण संचालकांवर कारवाईची मागणी.

Chairman Ramesh Tawadkar: सभापती रमेश तवडकर दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार? कुणाचा पत्ता कट होणार? याबाबत राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान, विधानसभा सभापती रमेश तवडकर दिल्लीत पोहोचले आहेत. तवडकरांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार अशा चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

शॅक कामगारांकडून पर्यटकांवर प्राणघातक हल्ला; पंच सदस्यासह ५ जणांना अटक!

कळंगुट येथील प्लॅनेट गोवा शॅकवर मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि शॅक कामगार यांच्यात आज पहाटे ३ वाजता झालेल्या वादावादीत एक पर्यटक गंभीर जखमी झाला. या प्रकरणात स्थानिक पंच सदस्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या स्थापनेसंदर्भातील चर्चेमध्ये खडाजंगी

सांगे पालिकेच्या सभेमध्ये बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरील विषयावरून नगरसेवकांमध्ये तू तू मै मै झाली.

मांद्रे जुनसवाडा डोंगरावर आग लागून पर्यावरणाचे नुकसान, मुख्यमंत्री तसेच आमदारांनी दखल घ्यावी : माजी सरपंच बाळा नाईक

मांद्रे जुनसवाडा येथे डोंगरावरील झाडांना वारंवार आग लागून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आमदार जीत आरोलकर यांनी गंभीर दखल घेऊन यावर उपाययोजना काढण्याची मांद्रे माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांची मागणी.

Goa Mining: पिळगाववासीय आक्रमक; मध्यरात्री खनिज वाहतूक रोखली!

पिळगाववासियांनी गुरुवापी मध्यरात्री खनिज वाहतूक करणारे वेदांताचे ट्रक अडवले. रात्री खनिज वाहतूक नकोच यावर स्थानिक ठाम.

Goa Accident: तिळामळ येथे दोन बाईकची समोरासमोर धडक, दोघेजण जखमी

तिळामळ येथे दोन बाईकची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जखमी झाले आहेत. आज (०३ डिसेंबर) रोजी सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT