गोवा

Goa News: मोठा आवाज आणि चुकीची नंबर प्लेट लावली तर पोलीस करणार कारवाई; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी

Akshata Chhatre

मोठा आवाज आणि चुकीची नंबर प्लेट लावली तर पोलीस करणार कारवाई

पर्वरी पोलिसांनी सायलेन्सर वापरून मोठा आवाज करणाऱ्या वाहनांवर तसेच चुकीच्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान रईश मागोस आणि नेरूळ पंचायत परिसरातून चार मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

युनायटेड ब्रदर्सने ॲडव्होकेट्स क्रिकेट लीगचे विजेते

ॲडव्होकेट्स क्रिकेट लीगमध्ये युनायटेड ब्रदर्सने जीसीए ग्राउंड, पर्वरी येथे झालेल्या अंतिम फेरीत रायझर्सचा पराभव करून विजय मिळवला. या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायमूर्ती कर्णिक तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उत्तर गोवा, इर्शाद आगा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्यम घोगळे याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

रेल्वे स्थानक प्रकल्पाला नेवरा ग्रामस्थांचा विरोध

केंद्र सरकारच्या नियोजित रेल्वे स्थानक प्रकल्पाला नेवरा ग्रामस्थांचा विरोध. ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर.

पंचायत सचिवांची मनमानी..!

पंचायत सचिवांच्या कारभारावरून लाटंबार्से पंचायतीच्या ग्रामसभेत नाराजी. कारवाईची मागणी.

नेवरा ग्रामसभेत खाजन शेतीचा विषय तापला

नेवरा ग्रामसभेत खाजन शेतीचा विषय तापला. शेतकरी आणि मानस समितीचे अध्यक्ष यांच्यात वाद. शेवटी आमदार विरेश बोरकर यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.

'बोगस' तक्रारी करणाऱ्यां विरोधात कारवाई करणार; कारापूर-सर्वणच्या ग्रामसभेत निर्णय

'बोगस' तक्रारी करणाऱ्यां विरोधात कारवाई करणार. कारापूर-सर्वणच्या ग्रामसभेत निर्णय. पोलिस बंदोबस्तात तासाभरात आटोपली ग्रामसभा. चार पंचसदस्यांची दांडी.

मांद्रे पंचायत ग्रामसभा; सरपंच आणि सचिव उपस्थित

मांद्रे पंचायत ग्रामसभेला सरपंच आणि सचिव उपस्थित. ११ पंच सदस्यांपैकी केवळ सरपंच उपस्थित. लोकांपर्यंत ग्रामसभा असल्याची माहिती न पोहोचल्याने ग्रामसभेला केवळ ९ ग्रामस्थ उपस्थित.

किल्ला बनवण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मोरजी पंचायत कला संस्थे मार्फत पेडणे तालुका मर्यादित आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेत आर.डी खलप हायस्कूल,विद्याप्रसारक हायस्कूल,भगवती हायस्कूल आदी यश संपादित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT