New Universities In Goa Dainik Gomantak
गोवा

New Universities In Goa: गोव्यात येणार नवीन चार विद्यापीठे; सरकारकडून तत्वत: मान्यता

सरकाराने खासगी विधेयक मंजूर केल्यानंतर आता राज्यात विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज येऊ लागले आहेत.

Pramod Yadav

New Universities In Goa: गोव्यात लवकरच नवीन चार विद्यापीठे येणार आहेत. राज्य सरकारने विद्यापीठांना तत्वत: मान्यता दिली आहे. अंतिम मंजुरीनंतर येत्या काही वर्षात राज्यात चार नवी विद्यापीठे सुरू होऊ शकतात.

सरकाराने खासगी विधेयक मंजूर केल्यानंतर गोव्यात नवीन विद्यापीठ सुरू करण्यासाठीचे अडथळे दूर झाले. त्यानंतर आता विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज येऊ लागले आहेत.

कोणत्या विद्यापीठांना मान्यता

1) उच्च शिक्षण संचालनालयाने वडोदरा-गुजरात येथील पारुल आरोग्य सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेचे पारुल विद्यापीठ

2) जयपूर-राजस्थान येथील कौशल्य विकास आणि उद्योजकता ग्लोबल फाऊंडेशनचे कौशल्य विकास विद्यापीठ

3) पुणे येथील माईरच्या एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डॉ. विश्वनाथ कराड जागतिक शांती विद्यापीठ

4) गोव्यातील सुनापरान्ता फाऊंडेशनच्या सुनापरान्ता विद्यापीठ

सरकाराने वरील चार विद्यापीठांना राज्यात विद्यापीठ सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र, अद्याप अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही.

साळगावकर कंपनीच्या प्रस्तावात डिझाईन, बीए व एमए, मास मीडिया, डेटा सायन्स व अॅनिमेशन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. माईर ग्रुपच्या विद्यापीठात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, विज्ञान, डिझाईन, फार्मसी, लिबरल आर्ट्स, कायदा, पत्रकारिता व इतर अभ्यासक्रम. तसेच,

पारुल विद्यापीठाच्या प्रस्तावात कौशल्य विकास डिप्लोमा अभ्यासक्रम, बी व्होकेशनल, एम. व्होकेशनल, डॉक्टरल प्रोग्राम व इतर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT