Mormugao Port Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: पर्यटकांच्या स्वागतासाठी करणार दीड लाख खर्च; यंदाच्या हंगामात 72 क्रूझ बोटी

जलपर्यटनाच्या जागतिक नकाशावर गोव्याला पक्के स्थान मिळवून देण्यासाठी ही शक्कल लढवण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

International Cruise Mormugao Port: राज्यात आलिशान क्रूझवरून पर्यटनासाठी गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे भव्यदिव्य स्वागत मुरगाव बंदरात केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक क्रूझ बोटीमागे 1 लाख ६५ हजार रुपये खर्च करण्याची तयारी सरकारने ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे.

व्यावसायिक पद्धतीने हे स्वागत व्हावे यासाठी एखादी कंपनीच त्यासाठी नेमण्याचा विचार सुरू आहे. जलपर्यटनाच्या जागतिक नकाशावर गोव्याला पक्के स्थान मिळवून देण्यासाठी ही शक्कल लढवण्यात येणार आहे.

या पर्यटन हंगामातील पहिली क्रूझ बोट मुरगाव बंदरात येत्या ११ नोव्हेंबरला येणार आहे. त्या पर्यटकांचे अभूतपूर्व असे स्वागत करण्याची तयारी सध्या करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटकांची ने-आण करणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून गोव्याचा समावेश त्यांच्या पर्यटन मार्गावर करावा यासाठी विशेष प्रयत्न सध्या करण्यात येत आहेत.

वस्तू व सेवा कर परिषदेने आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनावरील पाच टक्के जीएसटी सहा महिन्यांसाठी माफ केला आहे. यामुळे या काळामध्ये क्रूझ पर्यटन वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यामुळेच यंदाच्या हंगामात ७२ क्रूझ बोटी मुरगाव बंदरात येतील असे मानले जात आहे. गेल्या महिन्यात २४ रोजी २१८ पर्यटकांसह एक देशी क्रूझ बोट मुरगाव बंदरात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT