Maritime Awareness Car Expedition  PIB Goa
गोवा

Goa To Bhuj: 'शं नो वरुणः' भारतीय नौदलाच्या सागरी जागरुकता कार मोहिमेला दाबोळीतून आरंभ

3,000 किलोमीटर कापून पथक भुजला पोहचणार

गोमन्तक डिजिटल टीम

Maritime Awareness Car Expedition: भारतीय नौदलाच्या सागरी जागरुकता कार मोहिम “ शं नो वरुणः”च्या चौथ्या टप्प्याला दाबोळी येथून आरंभ झाला. भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल विक्रम मेनन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

Maritime Awareness Car Expedition

कमांडर अनिरुध्द रॉय यांच्या नेतृत्वाखाली वेस्टर्न नेव्हल कमांड टीममध्ये सेवारत अधिकारी (महिला अधिकाऱ्यांसह), नौसेनिक व इतर असे 43 जण सहभागी झाले आहेत. पश्र्चिम क्षेत्राच्या नौदल महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष शशी त्रिपाठी यासुध्दा सहभागी झाल्या आहेत. सदर पथक 19 एप्रिलपर्यंत 3,000 किलोमीटर कापून भुजला पोहचणार आहे.

Maritime Awareness Car Expedition

सदर पथक गोवा, महाराष्ट्र, गुजरात या किनारी राज्यांतून जाताना तेथील विविध शाळा, वृध्दाश्रम, अनाथाश्रम इत्यादींना भेटी देणार समुदाय विकास व सक्षमीकरणासाठी योगदान देईल. समुद्र किनारयांची स्वच्छता, नौदलाबद्दल जागृती मोहिम, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट,ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे.

अलिबाग येथील आंग्रे वॉर मेमोरियल व दीव येथील खुकरी मेमोरियल ला भेटी देऊन शूरवीरांना श्रध्दांजली वाहणार आहे. कार रॅलीचा मुख्य उद्द्श भारतीय नौदल, करिअर संधी, उपलब्धी यासंबंधी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT