What is Modi Government Initiatives for Goa Development
पणजी: केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्याला महत्त्वपूर्ण मालवाहतूक व क्रूझ पर्यटन केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत जलवाहतुकीसाठी ९ किनारी जेटींचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत मुरगाव बंदरावर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रूझ टर्मिनल तसेच फेरी टर्मिनल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १०१.७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मार्चपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील क्रूझ पर्यटन आणि मालवाहतूक क्षमता वाढण्यास चालना मिळेल.
गोव्याला कार्गो आणि क्रूझ हब म्हणून विकसित करण्याची योजना आहे. केंद्र व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही योजना तडीस नेली जाईल. त्याअंतर्गत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनलसह फेरी टर्मिनल उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय बंदर व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
‘सागरमाला’ योजनेअंतर्गत गोव्यात एकूण ९ जेटींचा विकास केला जाणार आहे. त्यात हळदोणे, रायबंदर, जुने गोवे, पिळगाव, बाणास्तरी, दुर्भाट, रासई, शिरोडा आणि सावर्डे या जेटींचा समावेश आहे. त्यावर सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ५० टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.