TMC Goa Dainik Gomantak
गोवा

TMC Goa:'गोव्यातील हूकूमशाही सरकारला सद्धबुद्धी दे'; प्रतिभा बोरकर यांचे महालक्ष्मीला साकडे

फिफा U-17 फुटबॉल स्पर्धेदरम्यान शालेय विद्यार्थी, युवा खेळाडूंना मोफत पास, प्रवास व इतर सुविधा सरकारने द्याव्यात

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील हूकूमशाही सरकारला सद्धबुद्धी दे असे साकडे गोवा तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रतिभा बोरकर (Goa TMC General Secretary Pratibha Borkar) यांनी महालक्ष्मीला घातले आहे. तृणमूल काँग्रेसच्या वतीने पणजी येथे शनिवारी (दि.01) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गोव्यात बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचेही बोरकर यावेळी म्हणाल्या.

प्रतिभा बोरकर म्हणाल्या, "सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशी तृणमूल काँग्रेसच्या वतीने पणजी येथील महालक्ष्मी मंदीराला भेट दिली. गोव्यात वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यातून गोमंतकीयांची मुक्ततता कर अशी प्रार्थना देवीला केली. गोव्यात भाजप सरकार आहे, ज्याचं हूकूमशाही पद्धतीने राज्य सुरू आहे, त्यांना सद्धबुद्धी दे असे अशी प्रार्थना केली."

यावेळी गोवा टीएमसीचे सहसंयोजक मारियानो रॉड्रिग्ज (Goa TMC Joint Convener Mariano Rodrigues) उपस्थित होते. मारियानो रॉड्रिग्ज म्हणाले, फिफा U17 फुटबॉल स्पर्धा गोव्यात (Women U-17 FIFA World Cup) होत आहे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आमची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडे मागणी आहे की, ज्या मुली, महिला फुटबॉल खेळतात किंवा या खेळाची आवड आहे त्यांना फिफाचे मोफत पास मिळावेत. तसेच, या सर्वांच्या प्रवास आणि नाष्ट्याची सोय देखील सरकाने करावी. गोव्याची फुटलबॉलचा मक्का अशी ओळख आहे. गोमंतकीयांना या खेळासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

नेहरू मैदानात फिफा स्पर्धेसाठी गोव्यातील शालेय विद्यार्थी, विविध क्लबसाठी खेळणारे खेळाडू यांच्यासाठी जागा रिकामी ठेवण्यात यावी. तसेच युवा फुटबॉल खेळाडू आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मोफत पास आणि प्रवासाची सोय करावी अशी मागणी गोवा तृणमूल काँग्रेसच्या वतीने मारियानो रॉड्रिग्ज यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT