Goa Tiger Reserve Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Reserve Project: व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य ठरणार? 'मुदतवाढ' आणि 'अवमान अर्जा' वर खंडपीठासमोर सुनावणी

Goa Tiger Reserve Project: ‘व्‍याघ्र प्रकल्‍प’ अधिसूचित करण्‍यासंदर्भात उच्‍च न्‍यायालयाने दिलेली 3 महिन्‍यांची मुदत संपल्‍याने ‘गोवा फाऊंडेशन’ने खंडपीठात अवमान अर्ज सादर केला होता.

Ganeshprasad Gogate

Goa Tiger Reserve Project: बरेच दिवस चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या व्याघ्र संरक्षित क्षेत्र प्रकल्पावर अखेर आज (दि. 6 नोव्हेंबर) सुनावणी होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

व्याघ्र संरक्षित क्षेत्र प्रकल्प संदर्भात सरकारने मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जावर व गोवा फाऊंडेशनच्या अवमान अर्जावर 6 नोव्हेंबरला एकत्रितपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी जर बघितली तर असे समजते की, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 24 जुलै रोजी गोवा सरकारला म्हादई व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याचे निर्देश दिले होते.

अर्थात त्यासाठी गोवा सरकारला तीन महिन्यांची मुदत देखील दिली होती. ही मुदतवाढ मिळावी म्हणून राज्य सरकारने 20 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र त्या अर्जावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ देणे नाकारले होते.

‘व्‍याघ्र प्रकल्‍प’ अधिसूचित करण्‍यासंदर्भात उच्‍च न्‍यायालयाने दिलेली 3 महिन्‍यांची मुदत संपल्‍याने ‘गोवा फाऊंडेशन’ने खंडपीठात अवमान अर्ज सादर केला होता.

‘गोवा फाऊंडेशन’ने केलेल्या अवमान अर्जात राज्य सरकारसह गोवा राज्य वन्यजीव मंडळ, मुख्य वन्यजीव वॉर्डन, प्रधान मुख्य वनपाल, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

याच संदर्भात आता मुदतवाढ अर्ज आणि गोवा फाऊंडेशनच्या अवमान अर्जावर आज एकत्रितरित्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT