Goa News | Ulhas Tuyekar Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिर्डीसाठी तिकीट बुकिंगची मागणी वाढली: उल्हास तुयेकर

Goa News: कदंब महामंडळ अतिरिक्त बससेवा सुरु करणार अशी माहिती उल्हास तुयेकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Goa News: दिवाळीच्या सुट्टीत शिर्डीला जाण्यासाठी तिकीट बुकिंगची मागणी वाढली असून कदंब महामंडळ अतिरिक्त बससेवा सुरू करणार असल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

सध्या महामंडळाकडे बसगाड्यांची संख्या कमी असली, तरी मागणी पाहून बससेवा वाढविण्यात येतील, असे ते म्हणाले. कदंबची शिर्डी वाहतूक सेवा खंडित झाली होती, ती आता रविवारपासून पुन्हा सुरू झाली आहे.

कदंब बससेवा वगळता शिर्डीला रोज 7 बसगाड्या जातात. त्यात प्रामुख्याने साई रुची ट्रॅव्हल, आनंद ट्रॅव्हल, एप्लस व्हीजन ट्रॅव्हल, हंस ट्रॅव्हल, व्हे फेअर व पावलू ट्रॅव्हल यांचा समावेश आहे. सकाळी 10.30 वाजता पहिली बस (Bus) सुटते, तर संध्याकाळी 7.30 वाजता शेवटची बस सुटते. कदंबची नियमित एक बस आता सुरू झाली असून ती रोज संध्याकाळी 6 वाजता मडगावहून सुटणार आहे.

कदंबची वातानुकूलित बसचे तिकीट 1 हजार 260 रुपये आहे, तर इतर वाहतूक कंपन्यांच्या बस तिकीट दरात बरीच तफावत आहे. कदंबची पहिली बस रविवारी पूर्ण भरली होती. मात्र, त्यात पुण्याला उतरणाऱ्या प्रवाशांची सोय करण्यात आली होती. शिर्डीचा हा प्रवास 661 कि. मी. अंतराचा असून किमान 15 तास तिथे पोहचण्यास लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT