Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: मुरगावात चोरट्यांचा हैदोस; मंदिरांनंतर आता शाळांवर लक्ष; केशवस्मृती शाळेत नासधूस करत 50 हजारांची रोकड लंपास

Goa Theft Case: मांगोरहील येथील सेंट तेरेझा हायस्कूल, वेळसावं येथील इन्फंट जीसस हायस्कूल नंतर आता मुरगावातील केशवस्मृती शाळेला चोरट्यांनी लक्ष केलंय.

Ganeshprasad Gogate

Goa Theft Case: दाबोळी येथील केशवस्मृती शाळेत काल म्हणजेच रविवारी (10 मार्च) चोरीची घटना घडली असून मुरगाव तालुक्यातील महिनाभरात ही तिसरी चोरीची घटना घडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे बोलले जातेय.

शाळेत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे चोरट्यांनी विद्यामंदिरालाही सोडले नसल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेत चोरट्यांनी सुमारे 50 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

सोमवारी सकाळी शिक्षक आणि कर्मचारी शाळेत आले असता त्यांना कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले.

तसेच अधिक तपास केला असता मुख्य कार्यालयासह अन्य तीन कार्यालये चोरट्यांनी फोडल्याचे त्यांना दिसून आले.

मुख्य कार्यालयातही सर्व कपाटे फोडून सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्तपणे टाकण्यात आली होती. या सर्व प्रकारानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर वास्को पोलीस श्वान पथकासहित घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान तपास करत असताना पोलिसांना CCTV फुटेजमध्ये तोंडाला मास्क बांधलेली 2 माणसे शाळा परिसरात वावरत असलेली दिसून आली.

या घटनेत शाळेतील वस्तूंसह रोख रक्कम मिळून 50 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी वेळसावं येथील इन्फंट जीसस अकादमी शाळेला चोरट्यांनी लक्ष केले होते. मागच्या आठवड्यातील गुरुवारी सकाळी इन्फंट जीसस अकादमी शाळेत चोरीची घटना घडली होती.

या घटनेत चोरट्यांनी शाळेची दानपेटी आणि कार्यालयातील रोख रक्कम लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

शाळेचे कर्मचारी गेट उघडण्यासाठी सकाळी 7 वाजता पोहोचले तेव्हा त्यांना कुलूप तुटलेले आणि दानपेटी गायब असल्याचे लक्षात आले.

मुख्याध्यापकांनी अधिक पाहणी केली असता त्यांना चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयाची तोडफोड करून ड्रॉवर, फायली आणि लिफाफे फोडल्याचे निदर्शनास आले. या घटनेत चोरट्यांनी 50 ते 60 हजराणाचा मुद्देमाल लंपास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT