आरोग्य केंद्र ते पोलिस स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या बाजूचे गटार उपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: आरोग्य केंद्र ते पोलीस स्थानकासमोरील रस्त्याची "दलदली"तून मुक्तता होणार

दै. 'गोमन्तक' मधून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष होत होते. पण आरोग्य केंद्रासह पोलीस ठाणे आणि शेतकरी कार्यालयाची आता "दलदली"तून मुक्तता होणार आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली (bicholim) सामाजिक आरोग्य केंद्रासह (Health Center) पोलीस ठाणे (Police Station ) आणि शेतकरी कार्यालयाची आता "दलदली"तून (swamps) मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे. दलदलीस कारण ठरणारा आणि मागील बरीच वर्षे दुर्लक्षित राहिलेले आरोग्य केंद्र ते पोलिस स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या बाजूचे गटार उपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे गटार उपासण्याकडे दुर्लक्ष झाल्याने मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात हे गटार तुंबून एका रांगेत असलेल्या आरोग्य केंद्रासह पोलिस स्थानक आणि शेतकी कार्यालयाच्या इमारतीसमोर दलदल आणि चिखलाचे साम्राज्य पसरते. यंदाही हीच समस्या निर्माण झाली आहे.

यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांसह पोलिस स्थानक आणि कृषी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापुर्वी दै. 'गोमन्तक' मधून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष होत होते. डिचोली शहराला जोडून असलेला हा परिसर कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने स्थानिक सरपंच गोकुळदास सावंत यांनी पुढाकार घेवून गटार उपसण्याचे काम हाती घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT