Valpoi : The water of Mhadai was flowing by touching the bridge of Kudshe village Sattari Goa. Dainik Goamantak
गोवा

Goa : पावसाचा कहर सुरूच

नदी-नाल्यांचे पाणी पात्राबाहेर, सत्तरीतील दहा गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत (Goa)

Mahesh Tandel, Padmakar Kelkar

पणजी : सलग तेराव्या दिवशी पावसाने झोडपल्याने राज्यात (Goa State) सर्वत्र पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. घाट माथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) सत्तरी तालुक्यातील नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी (Danger Lavel) गाठली आहे. म्हादई, रगाडा, वेळूस आणि वाळवंटी नदीला पूर आल्यामुळे व रस्त्यांवरून (Road) पाणी वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत होऊन वाहतुकीवर (Transport) परिणाम झाला. जोरदार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सोनाळ, धारखण, कुडसे, सावर्शे, गांजे, धामसे, खडकी, गुळेली, तार, कडतरी या १० गावांचा संपर्क वाळपई शहरापासून तुटला असल्याने या गावात आपत्कालीन यंत्रणेला तत्काळ पाचारण करा आणि लोकांना सुविधा द्या अशी मागणी होत आहे.

बुधवारी (ता. २१) रात्री ८.३० पासून राज्यात पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) सकाळी ८.३० पर्यंत राज्यात २८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. पुन्हा सकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे अचानक राज्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. पर्जन्यप्रवण सत्तरी, पेडणे, वाळपई या भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. राज्यातील बहुतेक सर्वच नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.
वाळवंटी नदीला पूर आल्याने सत्तरी तालुक्यातील घाटेली गावात पाणी शिरण्याच्या भीतीने नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. ठाणे-सत्तरी येथील कोत्राची तसेच कुशावती नदीलाही पूर आला आहे. पेळवदा-बागवाडा येथील वाळवंटी नदीच्या तीरावरील गोठणेश्‍वर मंदिर दिवसभर पाण्याखाली राहिले. गांजेजवळील पूल पाण्याखाली गेल्‍यामुळे वाळपई-फोंडा रस्ता बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. पूरस्थितीमुळे राज्यातील अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. शिवाय दळणवळण आणि दैनंदिन जीवनमानावर परिणाम झाला.
घाटात दिवसभर तुरळक दरडी कोसळण्याच्या घडल्या; मात्र, महामार्गावरील वाहतुकीत खंड पडला नाही. अश्‍वे-मांद्रे रस्त्यावर दरड कोसळल्याने काही वेळ वाहतुकीला अडचण झाली होती. शुक्रवारी (ता. २३) पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान वेधशाळेने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT