court, judge  
गोवा

जन्मठेप झालेल्या आरोपींचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळला

बाल न्यायालय न्यायाधीशांनी दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय सरकारने घेतला आहे.

Puja Bonkile

राज्यात १५ वर्षांपूर्वी खळबळ माजवलेल्या मंदार सुर्लकर याच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चार आरोपींनी मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज केले होते, ते सरकारने फेटाळले आहेत. बाल न्यायालय न्यायाधीशांनी दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय सरकारने घेतला आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी रोहन धुंगट, शेख नफियाझ मामलेकर, शंकर तिवारी, जोवितो रायन रेमोडियस पिंटो यानी मुदतपूर्व सुटकेसाठी गृह खात्याकडे अर्ज केले होते.

गृह खात्याच्या राज्य शिक्षा पुनः आढावा मंडळाने त्यांच्या या सुटकेसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून टीका-टिप्पणी मागवण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या चौघांची शिक्षा मुदतपूर्व सुटकेसाठी शिफारस केली होती, तर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी कोणतीच टिप्पणी केली नव्हती. आरोपीच्या पालकांनी त्यांना स्वीकारण्याची सहमती दाखविली होती. मात्र, खून झालेल्या मंदार सुर्लकर यांच्या पालकांनी त्याला विरोध केला होता. आरोपींनी तारुण्यात येत असलेल्या मंदार सुर्लकर याचा गळा आवळून व मारहाण करून अमानुष खून केला होता ते मुदतपूर्व सुटकेसाठी पात्र नाहीत अशी भूमिका मांडली होती. पोलिस अधीक्षकांनी या सुटकेसाठी हरकत घेताना आरोपी खटल्यातील साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे.

तसेच आणखी गुन्हा नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या अहवालानुसार आरोपींची मुदतपूर्व सुटकेसाठी शिफारस करता येत नाही असे बाल न्यायालयाच्या अध्यक्षांनी निर्णय दिला होता. सर्व आरोपी 15 ऑगस्ट 2005 पासून कारागृहात आहेत. सुमारे 14 वर्षांपेक्षा अधिक काळ ते तुरुंगात आहेत. त्यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्या सर्वांची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली होती. हे आरोप कारागृहातून पॅरोल व फरलोगवर अधुनमधून बाहेर येत असतात. त्यांच्या या मुदतपूर्व सुटकेला खून झालेल्या मंदार सुर्लकर याच्या कुटुंबियाचा विरोध आहे. या सर्व आरोपींनी सरकारने मुदतपूर्व सुटका फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे धाव घेऊन त्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT